नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) (Anti-Narcotics Task Force) नाशिक शहरात (Nashik City) पहिली कारवाई करीत मुंबई नाका परिसरात (Mumbai Naka Area) कारमधून मॅफेड्रॉनची (एमडी) तस्करी करणाऱ्या सराईतास अटक केली आहे. त्याच्याकडून ६५ हजार रुपयांचे २१.५ ग्रॅम एमडी जात केले आहे.
टास्क फोर्सने मुंबई नाका परिसरातील गायकवाड नगरच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सापळा रचला. तेथून जाणाऱ्या (क्र. एमएच ४३ बीके ८९८९) या कार चालकाला अडविण्यात आले. कारसह अंगझडतीत २१.५ ग्रॅम एमडी सापडल्याने संशयित प्रतीक अढांगळे (रा. सिडको) याला ताब्यात घेण्यात आले. राज्यात अमली पदार्थांची विक्री, वितरण आणि वापर करणाऱ्या गैरप्रवृत्तींत वाढ झाल्याने तरुणांच्या सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम जाणवत आहे. या निरीक्षणासह केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशावरुन महाराष्ट्रात (Maharashtra) ‘एएनटीएफ’ स्थापन आहे.
दरम्यान,पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या नियंत्रणात हा फोर्स कार्यान्वित आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधिपत्त्याखाली कामकाज सुरू आहे. प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्यात (Police Station) अमली पदार्थोंबाचत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास या फोर्सकडून होईल, त्यावर घटकाप्रमुख म्हणून उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. विशेषतः अमली पदाथांची शेती नष्ट करून व्यापाऱ्यांना प्रतिबंध करणे, ड्रग पेडलर्स व तस्करविरुद्ध प्रभारी कारवाई करून गुन्हे देोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे आदी स्कपाच्या कारवाईकरिता हा फोर्स कार्यान्वित आहे.
घटकनिहाय निर्देश
राज्य अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अर्थात एएनटीएफने अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरणात गुंतलेल्यांवर प्रभावी कारवाई करण्यासह अमली पदार्थांच्या अधीन गेलेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी परिक्षेत्रनिहाय (एएनटीएफ) पथके नेमली आहेत. यात, नाशिक परिक्षेत्रातील नाशिक शहर व ग्रामीण, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदूरबार या जिल्ह्यातील अमली पदार्थ विरोधी पथकांचा समावेश आहे. आता स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कारवाई सुरु केली आहे पुणे आणि नागपूर या दोन विभागात राज्यातील ग्रामीण व शहर पोलिसांची घटकनिहाय विभागणी करून या फोर्सचे स्वतंत्र काम सुरू आहे. त्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (एसआयजी) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात कारवाईचे निर्देश दिले आहेत.
प्रतीक हिस्ट्रीशिटर
ऑक्टोबर २०२३ मध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून तरुणाच्या घरात शिरुन खिडकी व दरवाजाची तोडफोड केल्याचा प्रकार सावता नगरात घडला होता, सागर गणपत पवार (वय २२) यांनी फिर्याद दिल्यावर प्रतीक अढांगळे (२२) याच्यावर अंबड पोलिसांत घराविषयी आगळीक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे




