नाशिक | प्रतिनिधी | Nashik
काठे गल्लीतल्या एका सोसायटीत कार चार्जिंगला लावण्यावरुन झालेल्या जबरदस्त राड्यात शहर पोलीस (City Police) दलातील एएसआयने कार चालकासह महिलेला ठार मारण्याची धमकी (Threat) दिली. त्यावरुन सहाय्यक उपनिरीक्षक शंकर जर्नादन गोसावी (वय ५४, रा. काठे गल्ली) या संशयिताविरुद्ध महिलेले फिर्याद दिली आहे. त्यावरुन गोसावीविरुद्ध गंभीर दुखापतीसह विनयभंग असे दोन स्वतंत्र गुन्हे भद्रकाली पोलिसांनी दाखल केले आहेत. या गुन्ह्यांबाबत भद्रकाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. विशेष म्हणजे सन २०२३ मध्ये या अंमलदारास महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
हे देखील वाचा : Nashik Fraud : एलआयसीला दोन कोटींचा गंडा
काठे गल्लीतील श्री आयकॉन इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबाकडे (Family) वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या रमेश दत्तात्रय फड वय ४७, रा. राणेनगर) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहर पोलीस हेडकॉर्टरला नेमणुकीस असलेल्या शंकर गोसावीविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद आहे. यासह त्याने गोसावीने कार मालक महिलेला शिवीगाळ करुन अश्लील हातवारे केले. तसेच महिलेलादेखील ‘सर्व्हिस रिव्हॉल्व्हर ‘ने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याबाबत पीडित महिलेले दिलेल्या फिर्यादीवरुन गोसावीविरुद्ध विनयभंगाचाही गुन्हा नोंद झाला आहे.
हे देखील वाचा : World AIDS Day : नाशिक जिल्ह्याची एड्समुक्तीकडे वाटचाल
दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फड हा सोसायटीत कार उभी करुन चार्जिंगला लावत होता. त्यावेळी संशयिताने त्याला मज्जाव करुन त्याच्यासह मालकाला शिवीगाळ केला. फडच्या हाताला गंभीर दुखापत केली. तसेच ‘माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे. नादी लागू नका, तुमचा गेम करुन टाकेन’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी व पंधरा दिवसांपूर्वी गोसावीने याच कारणातून वाद घातला होता. तर ‘डायल ११२’वर संपर्क साधत पोलिसांनाही (Police) बोलावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हे देखील वाचा : Nashik News : खेरवाडी शिवारात रेल्वे रुळावर आढळला विचित्र अवस्थेत युवक-युवतीचा मृतदेह
गोसावी मार्चमध्ये लाचखोरीत सापडले होते
५ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शंकर गोसावी याला कॅफे चालकांकडून अडीच हजार रुपयांचा ‘हफ्ता’ घेतांना अटक केली होती. गोसावी हा पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असताना एका कॅफेसंदर्भात अर्ज प्राप्त होता. त्याने कारवाई करण्याऐवजी कॅफे चालकाकडून ‘हफ्ता’ वसुली केली. त्यामुळे आयुक्तालयाने त्याला निलंबित केले होते. त्याने यापूर्वी बेपत्ता मुलींना शोधण्याचे उत्तम कार्य बजावले होते. मात्र, भाडेतत्त्वावर घर देणे, दगड-विटा, वाळूची विक्रीही केली. त्यामुळे पोलीस सेवेव्यतिरिक्तही त्याने इतरही व्यवसाय केल्याचे ‘एसीबी’ चौकशीत उघड झाले होते.