Sunday, December 15, 2024
HomeनाशिकWorld AIDS Day : नाशिक जिल्ह्याची एड्समुक्तीकडे वाटचाल

World AIDS Day : नाशिक जिल्ह्याची एड्समुक्तीकडे वाटचाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात गतवर्षी एचआयव्ही (HIV) बाधित आढळण्याचा दर ०.२६ टक्के होता. तो यंदा खाली उतरून ०.२४ टक्के झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा आता एड्समुक्तीकडे (AIDS) वाटचाल करू लागल्याचे दिसू लागले आहे.एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स) असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. हा आजार किंवा रोग नाही. एचआयव्ही विषाणूने शरीरात शिरकाव केल्यास संबंधित व्यक्तीचे शरीर अन्य रोगांचे माहेरघर बनू लागते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला

रोगप्रतिकारशक्ती हळूहळू क्षीण होत जाते. मानवी शरीरात या विषाणूने प्रवेश केल्यानंतर सहा महिने ते दहा वर्षांच्या कालावधीत कधीही त्या व्यक्तीला एड्स होऊ शकतो. एड्सच्या निदान चाचण्यांवर नव्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. जिल्ह्यात गतवर्षी बाधित आढळण्याचा दर ०.२६ टक्के होता. तो यंदा तो खाली उतरून ०.२४ टक्के झाला आहे. यंदा जिल्ह्यात ६३० एचआयव्ही बाधित नव्याने आढळून आले आहेत. सध्या दहा हजार रुग्ण एचआयव्हीवर उपचार (Treatment) घेत आहेत. सन २००५ मध्ये एड्स बाधितांची संख्या ६.११ टक्के आढळत होती. ती आता कमालीची खाली आली आहे. त्यामुळेच आता जिल्हा एड्समुक्तीकडे वाटचाल करू लागला आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : CM पदाच्या चर्चेत ट्विस्ट; फडणवीसांच्या निकटवर्तीयाचे नाव आले समोर

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाने सातत्याने प्रयत्न केल्याने एचआयव्ही बाधितांची संख्या कमी होत आहे. हा आकडा शुन्यावर आणावयाचा आहे. त्यासाठी युवक व समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे. शंका आल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. या चाचण्या व उपचार मोफत केले जातात. सर्व गुप्तता पाळली जाते.

डॉ. योगेश परदेशी, एड्स नियंत्रण सोसायटी, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या