नाशिक | Nashik
ठाण्यातील बदलापूरमध्ये (Thane to Badlapur) एका महिलेकडून एकदा नव्हे तर अनेक वेळा स्त्री बीज काढण्यात आल्याने स्त्री बीजाच्या (Egg trafficking) अवैध विक्रीचे रॅकेट उघड झाले होते. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले होते.
यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) आरोग्य विभागाने मुंबई नाका परिसरातील ‘मालती आयव्हीएफ सेंटर’ची कसून तपासणी करत काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. तसेच बदलापूर येथे आढळलेल्या कागदपत्रांबाबत खुलासा करण्या संदर्भात मालती आयव्हीएफ सेंटरला नोटीस देखील बजावली होती.
हे देखील वाचा : Nashik IVF Cneter Raid : बदलापूर स्त्री-बीज तस्करीचे नाशिक कनेक्शन; ‘या’ IVF सेंटरवर महापालिकेचा छापा
त्यानंतर आता या प्रकरणी नाशिकमधील (Nashik) मालती आयव्हीएफ (IVF) सेंटरच्या संचालकाला पोलीसांनी अटक केली आहे. बदलापूर पोलिसांनी काल (मंगळवारी) रात्री उशिरा मालती आयव्हीएफ (IVF) सेंटरचे संचालक डॉ. अमोल पाटील यांना अटक (Arrested) केली. पाटील यांच्यावर सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप आहे. आज (बुधवारी) त्यांना कल्याण सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, तपासादरम्यान स्त्री बीज तस्करीचे हे संपूर्ण रॅकेट बदलापूर येथून चालवले जात होते. आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे स्त्रीबीज अवैध मार्गाने विकले जात असल्याचा संशय आहे. गरजू महिलांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून या रॅकेटमध्ये ओढले जात असल्याचे बोलले जाते. या प्रकरणात डॉ. अमोल पाटील यांच्या अटकेनंतर नाशिकमधील त्यांच्या मालती आयव्हीएफ सेंटरवर आता टांगती तलवार आहे.




