Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'उबाठा' पक्षाचा कार्यकर्ता खंडणीखोर! आडगाव हद्दीतील बंटी कोळी पोलिसांच्या...

Nashik Crime : ‘उबाठा’ पक्षाचा कार्यकर्ता खंडणीखोर! आडगाव हद्दीतील बंटी कोळी पोलिसांच्या ताब्यात

तीन गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

धुळ्यातून नाशकात (Dhule to Nashik) स्थायिक होत छोटेमोठे खरेदी-विक्री व्यवहार करुन ‘शिवसेना उबाठा’ पक्षात स्वतःला कार्यकर्ता मिरवून घेत अनेकांच्या सदनिका परस्पर बळकावणाऱ्या आडगाव हद्दीतील सराईत गुंड बंटी ऊर्फ विशाल शरद कोळी (३६, रा. वृंदावननगर, जत्रा हॉटेलजवळ, आडगाव शिवार) याच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. चुटपूट राजकारण (Political) करताना त्याने पंचवटी व आडगाव भागातील अवैध व्यवसायांबाबत ‘इन्स्टाग्राम व फेसबुक’द्वारे लाईव्ह करत पोलीस आयुक्तांच्या ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ मोहिमेचे तोंडभरून कौतुक केले होते. मात्र, आता त्याच्यावरच या मोहिमेद्वारे पोलिसांसमोर ‘हात’ जोडण्याची वेळ’ आली आहे.

- Advertisement -

परस्पर वाहने व सदनिका बळकावणे, धमकी देणे, खंडणी उकळणे, जबरी लूट करणे अशा गंभीर स्वरुपाच्या तक्रारी व फिर्यादी बंटी कोळीविरोधात शहर पोलिसांत दाखल होत आहेत. कोळीविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे नोंद झाले असून, उबाठा पक्षाचा पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ता म्हणूण मिरविणाऱ्या कोळीच्या कारनाम्यांविरोधात थेट तक्रारी दाखल करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

YouTube video player

कोळी हा मूळचा धुळे जिल्ह्यातील (Dhule District) असून नाशिकमध्ये स्थायिक होत असतानाच एकेकाळी ‘श्रमिक’ चे संस्थापक सुनील बागुल यांच्या सेनेत ‘पूर्णवेळ’ पडलेला कार्यकर्ता होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता कोळीविरोधात ११ नोव्हेंबर रोजी सरकारवाडा व आडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक, जबरी चोरी व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रकरण – १

सागर चंद्रकांत आहिरे यांनी पहिली फिर्याद नोंदवली असून मार्च २०२५ मध्ये त्यांनी इटिंगा कार कोळीला भाडेतत्त्वावर दिली. व्यवहारानुसार, दरमहा ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु त्याने मोबदला दिला नाही. आहिरे यांनी कार मागितली असता कोळीने २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करून आहिरे यांची मेहुणी चैताली साळवे हिच्या ‘फोन पे’वरून स्वीकारली.

प्रकरण -२

दुसरी फिर्याद जयदीप रवींद्र बोरसे (रा. सावतानगर, सिडको) या सलून दुकानदाराने सरकारवाडा पोलिसांत फिर्याद नोंदवली. त्याअन्वये १९ जून ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील दि जे. डी. हेअर वर्ल्ड दुकानात येऊन सागर आहिरे यांची इटिंगा कार (एमएच ०३ सीएस १४०३) जयदीपला विक्री करण्याचे आमिष दाखवले. व्यवहाराच्या बहाण्याने १ लाख ३८ हजार रुपये फोन पे व उर्वरित ९० हजार रुपये घेऊन गाडीचा ताबा न देता विश्वासघात करून फसवणूक केली. तर, वीस हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.

प्रकरण – ३

तिसरी फिर्याद जळगावच्या भङगावातील अंतुर्ली बु। येथील अनिल वाल्मीक गोसावी यांनी दिली असून त्यांचा जत्रा-नांदूर लिंकरोडवरील जगन्नाथ अपार्टमेंटमध्ये फ्लॅट असून तो कुलूपबंद असता कोळीने घुसखोरी करून बळकावला. गोसावी यांच्या अपरोक्ष तो भाडेतत्त्वावर दिला. विचारणा केली असता स्वतःचा हक्क सांगून ‘तू जर पोलिसांत गेला तर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करेल, फ्लॅट परत पाहिजे असेल तर पाच लाख रुपये दे, अशी मागणी करत गोसावींना धमकी दिली.

ठळक मुद्दे

  • वृंदावननगरात शिवगर्जना प्रतिष्ठान नावाने कोळीचे उद्योग
  • नानाभाऊ कोळी यांच्या नावे वाचनालय सुरु केल्याचा दावा
  • इन्स्टाग्रामवर कोळीचे २५ रिल्स
  • यापूर्वी परिमंडळातून कोळीची तडिपारी
  • अनेक रिलमधून पोलीस आयुक्तांच्या कार्याचे कौतुक
  • कोळीचे अनेक कारनामे उघड होणार
  • तिन्ही गुन्ह्यांत स्वतंत्रपणे अटक
  • कोळी लवकरच होत जोडून सादर करणार ‘कायद्याचा बालेकिल्ला

ताज्या बातम्या

Nashik Mayor : भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी नावे निश्चित झालेल्या आडके...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका हिमगौरी आडके (Himgauri Adke) आणि उपमहापौर पदासाठी माजी आमदार बाळसाहेब सानप...