नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील एका व्यावसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याची घटना काठे गल्ली सिग्नलवर (Kathe Galli Signal) घडली आहे. मात्र, अपहरणकर्त्यांना पैसे दिल्यानंतर व्यावसायिक त्यांच्या तावडीतून सुटून थेट पोलीस ठाण्यात पोहचला. यानंतर घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, निखिल दर्यानानी असे अपहरण केलेल्या व्यावसायिकाचे (Businessman) नाव आहे. निखिल यांच्याच गाडीमध्ये बंदुकीचा (Gun) धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. शहरातील काठे गल्ली सिग्नल वरची ही घटना आहे.
यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्या पार्टनरकडून १५ लाख रुपयांची खंडणी घेतली. पैसे दिल्यानंतर निखिल हे स्वतः अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून पळाले व त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना (Mumbai Naka Police) दिली.
दरम्यान, अपहरणकर्ते निखिल यांची कार घेऊन पळाले होते. मात्र त्यांनी ती कार दादासाहेब फाळके स्मारकाजवळ (Dadasaheb Phalke Memorial) सोडून दिली व तेथून पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संपूर्ण नाशिक पोलिस (Nashik Police) अलर्ट झाले आहेत.