नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना जमून दंगा करीत त्याचे रील्स तयार करून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करीत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा व दहशत माजविण्याचा प्रकार केल्या प्रकरणी १० जणांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहासमोर संशयित (Suspected) संदीप लालु लहानगे,राम सोमनाथ वाजे,संतोष लहानगे,विकास लहानगे,रामा दिवे,राहुल नेहरे, व त्यांचे इतर तीन ते चार साथीदारांनी समाजामध्ये तेढ निर्माण होईल,खोटी अफवा पसरेल,शांतता भंग होऊन त्यांची दहशत निर्माण होईल असे व्हिडिओ तयार करून ते इन्स्टाग्रामवर अपलोड करून व्हायरल केले.
त्यानंतर या युवकांवर (Youth) गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून, हे सर्वजण सिन्नर तालुक्यातील दुगाव येथील रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.




