Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : वलटे खुनाच्या तपासाला चालना; दोघांचा शोध सुरु

Nashik Crime : वलटे खुनाच्या तपासाला चालना; दोघांचा शोध सुरु

सीसीटीव्हीमुळे महत्वाचा धागा हाती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हिरावाडीतील (Hirawadi) बनारसीनगरात २२ दिवसांपूर्वी घडलेल्या भारती माणिक वलटे या महिलेच्या खुनाचा (Murder) उलगडा करण्यात पोलिसांना अपयश येत असतानाच, हा कुणी व का केला याचा शोध सुरुच आहे. दरम्यान, प्रकरणात पोलिसांना आता एका सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचा लीड मिळाला असून, त्याद्वारे पंचवटी पोलीस आता संशयित मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. बनारसीनगरातील जेम्स स्कूलसमोरील निर्जन पटांगणात भारती माणिक वलटे (वय ५६, रा. हिरावाडी) या शिक्षक पत्नीचा कुणीतरी गळा आवळून खून केल्याचे रविवारी (दि.१९) उघड झाले होते.

- Advertisement -

आतापर्यंतच्या तपासात वलटे कुटुंबीयाचे (Valte Family) जाबजबाब नोदविण्यात आले असून, त्यांनी कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही, असे समजते. त्यातच वलटे यांच्या घरात नुकताच विवाह ठरविण्यात आला होता. दरम्यान, (दि. १९) वलटे या सायंकाळी जवळीलच बाजारात काहीतकी खरेदीसाठी गेल्यावर बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत पंचवटी पोलिसांत (Panchavati Police) मिसिंग दाखल करण्यात आली होती. तपास सुरु असतानात, काही त्यांचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात बलटे यांचा गळा आवळून खून केल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी तपासास गती दिली.

मात्र, परिसर निर्जन व मोकळा असल्याने तपासात अडथळे आले. यानंतर, परिसरातील सर्वच इन आणि आऊट रस्त्यावरील खासगी सीसीटीव्ही फूटेज पडताळण्यात आले. त्यात आता एक महत्त्वाचा व संशयास्पद लीड पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार, तपास सुरु झाला आहे. त्यामुळे लवकरच या हत्याप्रकरणाचा उलगडा शक्य आहे. हा खून झाला असला तरी मारेकरी कोण? हे समोर आलेले नाही. त्यातच वलटे कुटुंबीय व नातलगांकडेही चौकशी व जाबजबाब नोंदीची कार्यवाही पोलिसांनी पूर्ण केली आहे. त्यातच मृत वलटे व कुटुंबाचे कुणाशीही बाहेर बाद नव्हते, असे निष्पन्न झाल्याने मारेकरी बाहेरीलच असण्याचा संशय पोलिसांना (Police) बळावला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...