नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मोबाईलच्या सीमकार्डवरील (Mobile SIM) बॅलन्ससह टॉपअप व अन्य रिचार्जच्या सुविधेसाठी कार्यरत नाशिकमधील वितरकांनी ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीला (Idea Company) तांत्रिक पद्धतीने फसवून तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. पुण्यातील कंपनीने केलेल्या लेखापरीक्षणात हा घोटाळा उघड झाला असून गंगापूर पोलीस ठाण्यात तीन एंटरप्रायजेसच्या चार संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दीप्ती सोनजे, संदीप सोनजे, दीपक मोटे, अंजली अॅक्सेसिरीज, भूषण आहेर अशी संशयितांची नावे आहेत. हे सर्व संशयित वरील सेल्युलर कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी व वितरक आहेत. याबाबत पुण्यातील व्होडाफोन आयडिया कंपनीचे कायदेशीर सल्लागार तसेच प्रतिनिधी स्वप्निल अशोक लवटावार (४०, रा. उंदरी पुणे) यांनी फिर्याद नोंदवली आहे.
त्याअन्वये दीप्ती सोनजे या गंगापूर रोडवरील (Gangapur Road) महात्मानगर येथे टेलिकॉम क्षेत्राशी निगडीत स्वामिराज एंटरप्रायजेसच्या संचालक आहेत. त्यांनी व वरील संशयितांनी सप्टेंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘ई-टॉपअप कं पनीने अधिकृ त व्यवसायासासह थेट कमिशन देण्यासाठी ‘डिस्ट्रिब्युटर्स आयडी’ व ‘ई-टॉपअप’चे लॉगइन आयडी व पासवर्ड दिले होते.
त्याचा गैरवापर करून संशयितांनी वारंवार कं पनीच्या अॅप्लिकेशन’ सिस्टिमध्ये अनधिकृत काम करून कमिशन ‘टाईप’मध्ये बदल केले. म्हणजेच ‘डिफॉल्ट प्रोफाईल’ बदलून ती एमएनपी दर्शवली. त्यामुळे संशयितांसह त्यांच्या वितरक फर्म्सला जे नियमित कमिशन मिळत होते त्यापेक्षा अधिक कमिशन ‘ई-टॉपअप’च्या बॅलन्स स्वरुपात कं पनीकडून बेकायदेशीररीत्या उकळले. वरील कालावधीत संशयितांनी (Suspected) तब्बल एक कोटी २ लाख ४० हजारांचा गैरव्यवहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
नोटिसा देऊनही उपयोग शून्य
व्होडाफोनने (Vodafone) सर्वत्र प्रीपेड मोबाईल सेवेसाठी बॅलेन्स मोबाईल रिचार्ज व टॉपअपच्या सुविधा दिल्या आहेत. त्यानुसार नाशिकमध्येही वरील वितरकांना मोबाईल व्हाऊचर्स, रिचार्ज करण्यासंबंधी अधिकृत आयडी दिले आहे. मात्र, याच आयडीसह अॅप्लिकेशनचा गैरवापर करून संशयितांनी आपापल्या परीने ऑनलाईन सिस्टिममध्ये छेडछाड करून कमिशनची टक्केवारी व नफा बदलला. त्यामुळे मिळणाऱ्या निमयित नफ्यापेक्षा त्यांना बँक खात्यांत अधिकचा नफा क्रेडिट झाला. याबाबत संशयितांना विचारणा करून कायदशीर नोटीसही पाठवण्यात आल्या. मात्र, कंपनीचे समाधान न झाल्याने त्यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्याद नोंदवली.
‘यांच्या’ वर इतक्या रकमेच्या गैरव्यवहाराचा आरोप
- तकदीर किराण्याचे प्रोप्रायटर संदीप सोनजे १२ लाख ६२ हजार रुपये
- अंजली अॅक्सेसिरीजचे दीपक मोटे ३६ लाख २६ हजार
- एस. एस. टेलिकॉमचे भूषण आहेर ५६ लाख ६१ हजार रुपये





