Tuesday, January 13, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'बर्गमेन'वरील स्नॅचर अखेर सापडला; इराणी टोळीतील सराईत कल्याणमधून ताब्यात

Nashik Crime : ‘बर्गमेन’वरील स्नॅचर अखेर सापडला; इराणी टोळीतील सराईत कल्याणमधून ताब्यात

२२ गुन्ह्यांची उकल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

फक्त चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यात हातखंडा असल्याने दाखल गुन्ह्यांमुळे मोक्का कारवाईतून नऊ महिने तुरुंगात राहिलेल्या आंबिवलीतील सराईत चेनस्नॅचरला (Chainsnatcher ) पकडण्यात युनिट एकला (Unit One) यश आले. विशेष म्हणजे चोरी केलेल्या ‘बर्गमन’ मोपेडवरून नाशिकमध्ये येत त्याने पायी जाणाऱ्या विवाहितांसह सोसायटीत लिफ्टची वाट पाहणाऱ्या महिलांचे दागिने ओरबाडून नेण्याची पद्धत अवलंबली होती, असे तपासात समोर आले आहे.

- Advertisement -

सादीक अली ऊर्फ जाफरी सय्यद (३०, रा. आंबिवली, कल्याण) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण २४ गुन्हे उघडकीस आले असून १३ तोळे सोने हस्तगत करण्यात यश आले आहे. शहरात मागील काही दिवसांपासून चेनस्नॅचिंगच्या घटना वाढीस लागल्या. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी संशयिताचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी युनिट एकला मार्गदर्शन करून संशयितावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik MC Election : नाशकात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; ‘आप’च्या उमेदवारावर ताणली बंदूक!

त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. आंचल मुदगल यांच्या सूचनेने पथकाने संशयिताचा (Suspected) माग काढण्यास सुरुवात केली. सादीक हा भिवंडी तालुक्यातील अमनेगाव येथे लपून असल्याचे समोर आले. हवालदार नाझीमखान पठाण, अंमलदार मुक्तार शेख, युनिट दोनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, हवालदार सुनील आहेर यांना त्याची खात्री झाली. त्यानंतर कारवाई करण्यात आली. हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, नाझीमखान पठाण, मिलिंदसिंग परदेशी, विशाल काठे, अंमलदार मुक्तार शेख, चालक हवालदार सुक्राम पवार यांनी कल्याणमध्ये दोन दिवस आणि दोन रात्र साध्या वेशात सापळा रचला.

दरम्यान, दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सापळ्यात सापडल्यानंतर त्यास बेड्या ठोकण्यात आल्या, पोलीस (Police) चौकशीत त्याने २२ चेनस्नॅचिंगचे तसेच दोन वाहनचोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून दहा लाख रुपये किमतीचे १३.४ तोळे सोन्याच्या वजनाचे दागिने, एक कार आणि दुचाकी असा २६ लाख २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, ए.पी.आय. हेमंत तोडकर, पी. एस.आय. चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे यांनी सादीकची उलटतपासणी केली.

हे देखील वाचा : Nashik News : चौक सभेदरम्यान मंत्री महाजनांशी बाचाबाची

दिल्लीतून चोरली कार अन् पुन्हा चेनस्नॅचिंग

सादीक हा कुख्यात इराणी गंगचा सदस्य असून, त्यांच्यात दोन गट झाल्याने तो स्वतंत्र भाड्याने खोली घेऊन राहत होता. नऊ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर तो बाहेर आला. यानंतर त्याने पुन्हा नाशिककडे मोर्चा वळवला. तेथून तो चोरीच्या वाहनांनी शहरात दाखल व्हायचा, स्नॅचिंग केली की पुन्हा कल्याण अथवा श्रीरामपूरला मार्गस्थ व्हायचा, तो विवाहित असून त्याला एक लहान मुलगी आहे. विशेष म्हणजे त्याने दिल्लीतून चोरलेली ब्रिझा कारही हस्तगत करण्यात आली आहे.

म्हणून ‘बर्गमेन’ची निवड

महिलांचे दागिने ओरबाडून नेताना पकडले जाऊ नये व अपघात होऊ नये, म्हणूण सादीकने बर्गमेन मोपेड निवडली होती. दागिने ओरबाडताच फरार होण्यासाठी व वेगात वळण घेण्यासाठी (टर्न) या मोपेडची मुव्हमेंट यशस्वी असल्याने त्याने या वाहनाची निवड केल्याचे समोर आले आहे. आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे मुदगल यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : मतदानाआधी ‘लक्ष्मीदर्शन’ जोरात; मतांचा फुटला मोठा भाव

ताज्या बातम्या

राज

हा धोका मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेच आहे, नाही तर एक दिवस…;...

0
मुंबई | Mumbaiमनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील आपल्या भाषणातून उद्योगपती गौतम अदानींवर टीका केली होती. त्यानंतर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना...