नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सायबर फ्रॉड व गुन्ह्यांत नेहमीच ऐकिवात येणाऱ्या ‘एपीके’ फाईलने (APK File) अंबड एमआयडीसीतील (Ambad MIDC) एका कंपनी मालकाचा घात केला आहे. पाणी पुरवठ्चाचे देयक ऑनलाइन अदा करण्यासाठी सायबर चोरट्यांनी त्याला व्हॉट्स अॅपवर एपीके फाईल पाठविली असता, त्याने क्लिक मोबाईलचा करताच ताबा (अॅक्सेस) हॅकरने घेऊन त्याच्या कंपनीच्या दोन बँक खात्यांतून तब्बल सोळा लाख रुपये उडविले आहेत. त्यामुळे एपीके फाईल धोकेदायकच असल्याचे अधोरेखित झाले असून आता या गुन्ह्यांसंदभनि नाशिक शहर सायबर, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हा कंपनी मालक (Company Owner) असून त्यांची अंबड औद्योगिक वसाहतीत ‘गार्गी पॅकिंग इंडस्ट्रिज ही कंपनी आहे. दरम्यान, कंपनीने एमआयडीसीकडील पाणी पुरवठ्याचे देयक अदा केले नसल्याबाबत सायबर चोरट्यांनी १४ नोव्हेंबरपूर्वी फोन व व्हॉटस अॅप कॉल करुन माहिती दिली. आम्ही एमआयडीसीतून बोलत आहोत, आपले बिल थकले असून त्वरित ते भरा, अन्यथा ‘कनेक्शन’ बंद केले जाईल असे सांगितले.
त्याचदरम्यान, तक्रारदाराच्या मोबाईवर पाण्याचे कनेक्शन खंडित केले जाईल, या स्वरुपाचा मेसेज केला. त्यानंतर सोयबर चोरट्यांनी एमआयडीसी पाणीबिल अपडेट नावाची ‘एपीके’ फाईल पाठविली. बिल भरण्यासाठी तक्रारदाराने या एपीके फाईलवर ‘क्लिक’ करताच, त्यांच्या मोबाईसह सर्वच ऑनलाइन बँकिंगचा ताबा घेतला. यानंतर १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कंपनीच्या दोन एसबीआय बँक खात्यातून एकूण सोळा लाख सात हजार रूपये विविध खात्यात वर्ग झाल्याचे उघड झाले. त्यामुळे सायबर फ्रॉड झाल्याचे समजताच, त्यांनी पोलीस ठाणे (Police Station) गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार, गार्गी पॅकींग इंडस्ट्रिज या कंपनीच्या बँक खात्यातून १२ लाख, ८४ हजार रुपये व गागीं अॅग्रो सर्व्हिसेसच्या बँक खात्यातून तीन लाख, २२ हजार रूपये परस्पर वर्ग करून गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत.
दोघांकडून २३ लाख उकळले
शहरातील दोधा व्यावसायिकांना सप्टेंबर तेनोव्हेंबर २०२५ या कालावधीत टेलिग्राम प्रोफाईलवरन पार्टटाईम जॉबचे मेसेज पाठवून सायबर चोरट्यांनी दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तेवीस लाख रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे, दोघांनी वेगवेगळी राक्रम गुंतविल्यानंतर, टास्कची ऑर्डर पूर्ण करण्याच्या बहाण्याने हे पैसे लाटले पहिल्या तक्रारदारास आठ लाख अकरा हजार तर दुसऱ्या तक्रारदारास पंधरा लाख दोन हजार रुपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडले, गुंतविलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केली असता चोरट्यांनी दोघांनाही टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी पैसे ‘भरण्यास सांगितले, गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुद्दे
- एपीके फाईल आलीच तर करा डिलिट
- फाईलवर क्लिक केल्याने मोबाईलचा अॅडमिन अॅक्सेस मिळतो.
- बँकेशी संबंधित सिम क्लोन केली जातात.
- सर्व मेसेज अलर्ट आणि ओटीपी चोरट्यांना मिळतात.
- पीडित व्यक्तीच्या फोनवर मेसेज येत नाही.
- इंटरनेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड आणि इतर सर्व सेवांचा पूर्ण ताबा मिळतो.
- व्हॉट्सअॅपवर आलेली कोणतीही एपीके फाइल ‘इस्टॉल’ करू नये.
- कोणतीही सरकारी संस्था किंवा युटीलिटी सेवा व्हेरिफिकेशनसाठी ही फाईल मागत नाही वा पाठवत नाही.





