Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime : प्रेमी युगलाने रेल्वेसमोर येत संपवलं आयुष्य; कारण अस्पष्ट, पोलिसांकडून...

Nashik Crime : प्रेमी युगलाने रेल्वेसमोर येत संपवलं आयुष्य; कारण अस्पष्ट, पोलिसांकडून कुटुंबीयांचा शोध सुरु

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

अज्ञात प्रेमी युगलाने (Couple) हातात हात धरून रेल्वे लाईनवर (Railway Line) असलेल्या जेलरोड (Jail Road) पवारवाडी समोर आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. आत्महत्या (Suicide) केलेल्या प्रेमी युगलाची ओळख पटलेली नसून, हे प्रेमीयुगल व त्यांचे नातेवाईक कोण आहेत याबाबत पोलीस कसून शोध घेत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक वृत्त असे की, जेलरोड परिसरात असलेल्या पवारवाडीच्या पुढे एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ पहाटे दोन ते तीनच्या सुमारास मुंबईवरून भुसावळकडे (Mumbai to Bhusawal) जाणाऱ्या मुंबई-हावडा एक्सप्रेस समोर या अज्ञात प्रेमी युगलाने हातात हात धरून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार संदीप कुऱ्हाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

YouTube video player

यातील मृत (Death) युवक अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून, सडपातळ बांध्याचा होता. त्याने काळ्या रंगाची कार्गो पॅन्ट, काळा हाफ शर्ट व पांढरे जॅकेट परिधान केले होते. तर मृत युवती अंदाजे २० ते २२ वर्षे वयोगटातील असून,मध्यम बांध्याची होती. तिने निळी लेगीन्स,निळ्या-पांढऱ्या चौकटींचा टॉप व जॅकेट घातले होते. मृतदेहाच्या खिशात सिटीलिंक बसचे तिकीट मिळाल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला.

यावेळी तपासात असे समोर आले की, शुक्रवारी हे दोघे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) बेझे फाटा येथून बसने निघाले. त्यानंतर ते रविवार कारंजा येथे उतरले व नांदूर नाका मार्गे नाशिक रोडकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले.यावेळी प्रवासादरम्यान त्यांनी बस चालक व वाहकाकडे पवारवाडी-जेलरोडकडे जाणाऱ्या रस्त्याची चौकशी केली होती. रात्री नऊच्या सुमारास ते सैलानी बाबा चौकात उतरले व त्यानंतर राज राजेश्वरी मार्गे पवारवाडी-एकलहरे गावाजवळील रेल्वे लाईनवर थांबले.यानंतर पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी रेल्वेसमोर येत आत्महत्या केली.

दरम्यान, मयत युवक-युवती हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किंवा आसपासच्या परिसरातील (Area) असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडे व नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस (Police) हवालदार संदीप कुऱ्हाडे करीत आहेत.

ताज्या बातम्या

श्रीनावास

Ajit Pawar Death: अजितदादांचे कोणतेही धार्मिक विधी होणार नाही; भाऊ श्रीनावास...

0
बारामती | Baramatiमहाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. येत्या ६ जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणे...