Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : तीन गोवंशांची सुटका; एकास अटक, युनिट एकची कारवाई

Nashik Crime : तीन गोवंशांची सुटका; एकास अटक, युनिट एकची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संगमनेर येथे गोवंशीय जनावरांना (Animals) कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पिकअपला नाशिकरोड परिसरात (Nashik Road Area) अडविण्यात येऊन तीन गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या (Unit One) पथकाने याप्रकरणी एकाला अटक केली असून, गोवंशीय जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. गणेश तानाजी मते (४०, रा. मुरंबीगाव, वाडिवऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

शहर गुन्हेशाखा युनिट एकचे अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप यांना नाशिकरोड परिसरात पिकअपमधून (Pickup) गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेने सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार रमेश कोळी, नाझीमखान पठाण, विलास चारोस्कर, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, किरण शिरसाठ, सुक्राम पवार यांच्या पथकाने दसक पुलाजवळ दशनाम गोसावी समाज मंडळाच्या समोर सापळा रचला.

YouTube video player

दरम्यान, यावेळी संशयित पिकअप (एमएच १५ एचएच ९५६०) रोखला. पिकअपची तपासणी केली असता त्यात तीन गोवंश जनावरे होती. संशयित मतेकडे चौकशी केली असता, त्याने सदरची जनावरे ही कुरण, संगमनेर येथे जुनेद खान याच्याकडे कत्तलीसाठी (Slaughter) नेत असल्याचे सांगितले. पिकअपसह गोवंश असा ७ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...