Thursday, May 29, 2025
Homeक्राईमNashik Crime : पंचवटीत पित्यासमोर निष्पाप तरुणाचा खून; मारेकरी पसार

Nashik Crime : पंचवटीत पित्यासमोर निष्पाप तरुणाचा खून; मारेकरी पसार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

वडिलांसमवेत पंचवटीतील (Panchvati) बुधवारच्या भाजीपाला बाजारात खरेदीसाठी आलेल्या मुलाचा (Son) काही सराईतांनी पैशावरून मुद्दाम वाद घालत केलेल्या बेदम मारहाणीत (Beating) अतिरक्तस्त्रावाने मृत्यू (Death) झाला. गाडगे महाराज पुलावर सर्वांदेखत हा प्रकार घडला. या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीतागुंफा रोडवरील परदेशी भवनात राहणारा नंदलाल ऊर्फ सूरज जगनकुमार दास (१९) हा वडिलांसमवेत बुधवारी आठवडे बाजारात (Weeks Market) खरेदीसाठी सायंकाळी सातच्या सुमारास आला होता. वडिलांसमवेत गाडगे महाराज पुलासमोरील बाथरूमसमोरून जात असताना गुंडांचे टोळके तेथे आले आणि त्यांनी पैशावरून विनाकारण वाद घातला. दास आणि गुंडांत जोरदार भांडणानंतर टोळक्याने नंदलालवर हल्ला चढवत त्याला रॉडने बेदम मारहाण केली.

दरम्यान, या मारहाणीत त्याच्या डोक्यात घाव बसून रक्तस्त्राव सुरू झाल्याने जागीच कोसळला व गुंड पळून गेले. वडील (Father) जगनकुमार आणि तेथील काही नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जगनकुमार दास यांच्या म्हणण्यानुसार टोळक्याविरुद्ध शहर पोलिसांनी (City Police) तक्रार दाखल करून घेतल्याचे कळते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अतिवृष्टीमुळे नगर तालुक्यातील 45 गावे जलमय

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मागील 24 तासांत अहिल्यानगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांत महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केडगाव व वाळकी येथे प्रत्येकी 100.5...