Saturday, September 5, 2026
HomeनगरAhilyanagar : लाडक्या बहिणींसाठी 2984 कोटी वितरीत करण्यास मान्यता

Ahilyanagar : लाडक्या बहिणींसाठी 2984 कोटी वितरीत करण्यास मान्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सर्वसाधारण घटकांसाठी28290 कोटी रुपयांची अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रु.2984.00.00 कोटी (अक्षरी रु. दोन हजार नऊशे चौरेऐंशी कोटी फक्त) इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा रु.1,500/- इतकी रक्कम देण्यात येते.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...