Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : 'नायलॉन' ची खरेदी-विक्री रोखण्यासाठी सायबर गस्त

Nashik Crime : ‘नायलॉन’ ची खरेदी-विक्री रोखण्यासाठी सायबर गस्त

मांजाविरोधी बावीस गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात पोलिसांनी (Police) नायलॉनसह घातक मांजा (Manja) वापरण्यावर बंदी घालून विक्रेत्यांसह वापरकर्त्यांची धरपकड़ सुरू केली आहे. आतापर्यंत बावीसपेक्षा जास्त गुन्हे नोंदवून संशयितांना (Suspects) पकडल्यावर आता ‘नायलॉन ‘ची खरेदी-विक्री रोखण्यासाठी सायबर गस्तदेखील सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे सोशल मीडियावर होणाऱ्या विक्रीसह गोपनीय माहितीद्वारे दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

- Advertisement -

शहरात मांजा प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू आहेत. मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी होणार असून, आतापासूनच पतंगबाजी सुरु झाली आहे. सणाच्या काळात पतंगबाजीदरम्यान नायलॉन मांजामुळे होणारी जीवितहानी अथवा गंभीर दुखापत रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार, पोलीस पथकांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संबंधितांवर कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) (अ) अन्वये मनाई आदेश लागू असल्याने आतापर्यंत विक्रेत्यांसह साठा करणा-यांची धरपकड पोलिसांनी केली आहे.

दरम्यान, संशयितांच्या हालचाली, कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीला भय, धोका किंवा दखापत झाल्यास संबंधितांवर तडीपारी प्रस्तावित करण्यात येत आहे. तर जानेवारी २०२४ मध्ये पोलीस आयुक्तालयाने (Police Commissionerate) १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवसात तब्बल ४२ जणांना तडीपार केले होते. त्यांना २० दिवस शहरासह जिल्ह्यात वावरण्यास व मुक्कामास प्रतिबंध करून पोलिसांनी सणाचा ‘धागा’ सुरक्षित केला होता. दरम्यान, संबंधित गुन्ह्यातील संशयितांना तडीपार केले असून, मोक्कादेखील प्रस्तावित आहे.

मुद्दे

– सायबर गस्तीद्वारे विक्रेते-खरेदीदारांवर नजर
– नायनॉल विक्रीच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश
– अल्पवयीन मुलांच्या पालकांवर ही गुन्हे दाखल
– २८ डिसेंबर २०२० रोजी नायलॉन मांजामुळे महिलेचा मृत्यू
– नोव्हेंबर २०२४ मध्ये वडाळ्यात बालकाचा मृत्यू
– २०२४ मध्ये संक्रांतीच्या दिवशी १९ तरुण जखमी
– डिसेंबर २०२४ मध्ये दाखल गुन्ह्यातील संशयित तडीपार
– संक्रांतीनंतर शहरात वास्तव्यास परवानगी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...