नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तरुणास मारहाण
जुना गंगापूर नाका येथे मंगलवाडीत युवकाला घराबाहेर बोलाविले आणि कुरापत काढत ट्युबलाईटने मारून दुखापत केली. प्रतिक बाबासाहेब लांडगे (२०, रा. साईदर्शन अपार्टमेंट, सावरकरनगर, गंगापूर रोड) असे संशयिताचे नाव आहे. प्रथमेश अजय वाघ (रा. मंगलवाडी, जूना गंगापूर नाका) या युवकाच्या फिर्यादीनुसार, हा प्रकार रविवारी(दि. २६) घडला. संशयितांने प्रथमेशला घराबाहेर बोलावून घेत माझे घड्याळ दे अशी कुरापत काढून ट्युबलाईटच्या साहाय्याने मारून दुखापत केली. सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : मुंढेगावात बेकायदा घोडा बैल शर्यत आयोजित करणे भोवले; उपसरपंचासह सदस्यांवर गुन्हा
एकास बेदम मारहाण
सिडकोतील सरस्वती विद्यालयाजवळ तिघा संशयितांनी संगनमत करून एकाला बेदम मारहाण करीत दुखापत केली. संजय पवार, स्वप्निल पवार, प्रविण पवार (सर्व रा. अंबड) अशी संशयितांची नावे आहेत. विनायक दिलीप शेवरे (रा. पाटीलनगर, सिडको) याच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच, एकाने त्याच्या हातातील कड्याने मारून दुखापत केली. अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चप्पल फेकल्याने हाणामारी
चप्पल व शूज बाहेर का फेकले अशी कुरापत काढून एकाला मारहाण करीत शस्त्राने मारून दुखापत केली. विजय दिलीप पवार, सुष्मा विजय पवार अशी दोघा संशयितांची नावे आहेत. अजय दिलीप पवार (रा. शिवशक्ती चौक, सिडको) याच्या फिर्यादीनुसार, संशयित हे त्याचा मोठा भाऊ व भाऊजयी आहे. रविवारी (दि. २६) दुपारी घटना घडली असून अंबड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : क्राईम डायरी – तीन मारहाणीच्या घटनांसह अपघात, चोरीच्या घटना
गजाच्या सहाय्याने मारहाण
गोरेवाडीतील शास्त्रीनगरमध्ये तिघा संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून एकाला लोखंडी गजाने मारून दुखापत केली आहे. आकाश कैलास पगारे (२७), जयेश कैलास पगारे (२४), सागर तुकाराम जेडगुले (२५, सर्व रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी, उपनगर) अशी संशयितांची नावे आहेत. मनोज राम फड (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २५) मध्यरात्रीच्या सुमारास संशयितांनी मनोज याच्याशी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर संशयिताने लोकंडी गजा मनोजला मारहाण केली. नाशिकरोड पोलिसात मारहाणीसह शस्त्राचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट आयडी बनवून अश्लिल कमेंट
पीडितेचा सोशल मीडियावर बनावट आयडी तयार करून त्यावर अश्लिल कंमेट केल्याप्रकरणी संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुलतान शहा असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने पीडितेच्या नावाने इन्स्टाग्राम यावर बनावट आयडी तयार केला आणि त्यावर पीडितेचे खासगी फोटो ठेवले. त्यावर अश्लिल कमेंट करीत पीडितेचा मानसिक छळ केला. तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत बदनामी केली. अंबड पोलिसात आयटी कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार; हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी
हटकल्यातून वाद टोकाला
जेलरोड येथील पाण्याच्या टाकीजवळ लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकले असता, त्याने ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला काहीतरी हत्याराने मारून दुखापत केल्याची घटना घडली. अजय अशोक सिंग उर्फ सोनू शिंग्या (२६, रा. वैभव शांती अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी, जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. विजय नानाजी गांगुर्डे (रा. परिवर्तन बंगला, चंपानगरी, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, हा प्रकार शुक्रवारी (दि. २४) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. संशयिताने शिवीगाळ व मारहाण करीत काहीतरी हत्याराने मारून दुखापत केली. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल असून, संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
तलवारीसह दोघे ताब्यात
सिडकोतील गणेश चौकात असलेल्या महेश भवन परिसरातील दोघा संशयितांनी तलवारीसह अटक केली आहे. गोपाल मुरलीधर जाधव (२६, रा. गणेश चौक), कैलास दिलीप सैंदाणे (२१, रा. सोनवणे चाळ, गणेश चौक, सिडको) असे दोघा संशयितांची नावे आहेत. अंमलदार रामनाथ जाधव यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. २६) रात्री अडीचच्या सुमारास संशयितांनी हातात धारदार तलवारी बाळगून परिसरात दहशत माजवित असताना अंबड पोलिसांनी अटक केली. अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम मजूर ठार
बांधकाम साईटवर वाळूची पाटी डोक्यावर घेऊन चढत असताना पाय घसरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यु झाला. गौतम सखाराम काळे (४०, रा. दसक, सैलानी बाबा, नाशिकरोड) असे मृताचे नाव आहे. शनिवारी (दि. २५) सकाळी नऊच्या सुमारास बांधकाम साईटवर ही घटना घडली. यात जखमी झालेल्या मजुरास मोहम्मद उस्मान यांनी आडगाव मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल केले असता, रात्री साडेदहाच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. आडगाव पोलिसात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
वाहनांची चोरी
पंचवटी आणि अंबड परिसरातून चोरट्यांनी दुचाकी वाहने लंपास केली आहेत. शुभम अनिल नवले (रा. लामखेडे मळा, तारवालानगर) यांची ५५ हजारांची दुचाकी १५ तारखेला मध्यरात्री रुई अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेली. पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल आहे. अजय सोमनाथ निकम (रा. सावतानगर, सिडको) यांची १० हजारांची मोपेड २८ मार्च रोजी मध्यरात्री सावतानगरमधील औंदुबर चौकातून चोरट्याने चोरून नेली. अंबड पोलिसात गुन्हा दाखल आहे.