नाशिक | प्रतिनिधी | Nashik
साठ हजार रुपयांची चाेरी
आडगाव शिवारातील जत्रा हॉटेल परिसरातील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने ६० हजार रुपये चोरून नेले. शुकव्रारी (दि.१२) सायंकाळी पावणे सहा ते साडेसात या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही घरफोडी करीत पर्समधील ६० हजारांची रोकड चोरून नेली. आडगाव पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नॅचराेपॅथीतील साहित्य लंपास
कॉलेजरोड परिसरातील स्पर्श नॅचरोपॅथी सेंटरचे लॉक तोडून संशयितांनी संगनमताने ७३ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. शैलेजा मालविया, जयदीप मालविया (रा. स्प्रिंगफिल टॉवर, गंगापूर रोड) अशी संशयितांची नावे आहेत. अजित बलदेव गिरी (रा. वरळी, मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी संगनमत करून ५ ताखेला कॉलेजरोडवरील गिरी यांच्या स्पर्श नॅचरोपॅथी सेंटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि साडेहजारांची रोकड, २५ हजारांचा सीसीटीव्ही कॅमेरा सेट, १५ हजारांचा मोबाईल, २५ हजारांचे चांदीचे साहित्य असा ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज बाहेर फेकून दिल्याचे फोन करून सांगितले. प्रत्यक्षात साहित्य चोरी करून नेत घरफोडी केली. गंगापूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
हे देखील वाचा : Nashik Accident News : कसारा घाटात कंटेनरची सहा ते सात वाहनांना धडक
वाहनांची चाेरी
इंदिरानगर व अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. रवींद्र जोशी (रा. बडदेनगर) यांची २० हजारांची दुचाकी शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्री पाथर्डी फाटा येथील रिलायन्स मॉलसमोरून चोरून नेली. इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर, सूर्यकांत फोकणे (रा. मखमलाबाद रोड) यांची २० हजारांची दुचाकी (एमएच १५ सीएन ५४१६) १० तारखेला कोशिकोनगर येथून चोरीला गेली. अंबड पोलिसात गुन्हा दाखल आहे.
दागिने लांबविले
अंबड येथे उघड्या घरातून चोरट्याने ६० हजारांचे दागिने चोरून नेले. भरत दगडू नागरे (रा. शिवमल्हार कॉलनी, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. १३) पहाटे साडेचारच्या सुमारास घरात शिरून चोरट्याने २० हजारांची साेन्याची पोत, ४० हजार ७४० रुपयांची सोन्याची पोत असे ६० हजार ७४० रुपयांचे दागिने चोरून नेले. अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
ध्रुवनगरात एकाची आत्महत्या
गंगापूर राेडवरील ध्रुवनगर येथील अपार्टमेंटमध्ये एकाने गळफास घेत आत्महत्या केली. अंकुश हिंमत वंजारे (३२, रा. विरा गॅलक्सी अपार्टमेंट) असे मृताचे नाव आहे. अंकुश याने शनिवारी (दि. १३) सायंकाळी घरातील बेडरुममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. भाऊ अमोल याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मयत घोषित करण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गंगापूर पोलीस तपास करत आहेत.
आयशर चालकावर गुन्हा
मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात झालेल्या आयशर ट्रक व ब्रीझा कारच्या अपघातप्रकरणी आयशर चालकाविरोधात चौघांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बापू मोतीराम अहिरे (रा. पंचशिलनगर, ओझर) असे संशयित चालकाचे नाव आहे. अजीज फिरोज तांबोळी (रा. सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्री महामार्गावरील श्री चक्रधर स्वामी मंदिरासमोर भरधाव वेगातील आयशरने (एमएच १५ जीव्ही ९१९०) दुभाजक तोडून विरुद्ध लेनला येत समोरून येणाऱ्या ब्रीझा कारला (एमएच ०५ डीएच ९३६७) धडक दिली होती. यात रहेमान सुलेमान तांबोळी (४२), अरबाज चंदुलाल तांबोळी (१९), सिजाउद्दीन उर्फ सज्जू नवाब शेख (४०), अक्षय लक्ष्मण जाधव (२४) हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले होते. याप्रकरणी आयशर ट्रक चालक अहिरे विराेधात आडगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे. उपनिरीक्षक मयूर निकम तपास करीत आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : परिमंडळ दाेनमध्ये सरप्राईज कॉम्बिंग; ७७ टवाळांवर कारवाई
पार्किंग प्रतिनिधीस मारहाण
सराफ बाजारातील पंचमुखी हनुमान पे ॲण्ड पार्क याठिकाणी वाहन पार्किंगच्या वादातून एका तेथील कर्मचार्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. सूरज उबाळे असे संशयिताचे नाव आहे. राजेश सराफ (५७, रा. वावरेनगर, कामटवाडा) यांच्या फिर्यादीनुसार, ते पे ॲण्ड पार्क याठिकाणी कामावर असताना संशयितास त्यांना पार्किंगमधून बाहेर जाण्यास सांगितले असता, त्यावरून त्याने वाद घालत शिवीगाळ व मारहाण केली. यात सराफ यांच्या बोटाच्या करंगळीला फॅक्चर झाले. सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा