नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील (Panchvati) रामवाडीत (Ramwadi) काहीतरी कारणातून दोन कुटुंबातील गटांत (Group) तुफान राडा झाला. यात एका गटाने किराणा दुकानातील सामानाचे नुकसान केले. तर हाणामारीत (Fight) दगड-विटांसह लाकडी दांडक्यांचा वापर करण्यात आला. याप्रकरणी पंचवटीत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अक्षय बाबासाहेब पांचाळ (२१, रा. भागवत चाळ, रामवाडी, पंचवटी) याच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि.१०) सकाळी संशयित शेखर क्षत्रिय, अप्पा क्षत्रिय यांनी अक्षयला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर त्याचा मित्र अजय कानकुसे यालाही मारहाण करीत धमकावले. तसेच वाहनावर लाकडी दांडका मारून नुकसान (Damage) केले. तर, शेखर दत्तात्रय क्षत्रिय (४५, रा. क्षत्रिय किराणा दुकान, रामवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित अक्षय पांचाळ, विजय पांचाळ, गणेश सूर्यवंशी, प्रथमेश सूर्यवंशी, राजेश सूर्यवंशी व अक्षयचा मित्र यांनी शेखर यांच्या वाद घातला.
यावेळी अक्षयने शेखरच्या डोक्यात पाठीमागून वीट मारली. तर, गणेश, प्रथमेश, राजेश यांनी लाकडी दांडक्यांनी शेखर व योगेश यांना मारहाण केली. संशयित विजय पांचाळ याने क्षत्रिय यांच्या किराणा दुकानाचे शटर वर केले आणि काऊंटरवरील काचेच्या फरसाण व चॉकलेटच्या बाटल्या फेकून नुकसान केले. पंचवटी पोलिसात (Panchvati Police) परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.