Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik Crime : नाशिकमध्ये मद्यधुंद तरुणींचा राडा; एकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत...

Nashik Crime : नाशिकमध्ये मद्यधुंद तरुणींचा राडा; एकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण, Video व्हायरल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील सिडको परिसरामधील (Cidco Area) स्टेट बँक चौकात काल (शुक्रवारी) रात्रीच्या सुमारास काही मद्यधुंद (Drunk) तरुणींनी राडा घातल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, यावरून नाशिकमध्ये (Nashik) नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, या तरुणींनी सिडकोतील स्टेट बँक चौकात (State Bank Chowk) सुरुवातीला गोंधळ घातला. यानंतर त्यांनी एका व्यक्तीची कॉलर पकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. सध्या या तरुणींचा गोंधळ घातल्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

YouTube video player

दरम्यान, या तरुणींनी (Young Women) फोन करून त्यांच्या साथीदारांना देखील त्याठिकाणी पाचारण केले होते. यानंतर काही वेळातच त्या तरुणांनी दुचाकीवर घटनास्थळी येत तरुणींची अवस्था बघून त्यांना गाडीवर बसवून घेऊन गेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी (Police) गतीने चक्रे फिरवली असून, सदर तरूणींचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे या तरूणींवर काय कारवाई केली जाते, हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

ताज्या बातम्या