Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : पीएल ग्रुपच्या 'जल्लाद' विरोधात खंडणीचा गुन्हा; सातपूर पोलीस करणार...

Nashik Crime : पीएल ग्रुपच्या ‘जल्लाद’ विरोधात खंडणीचा गुन्हा; सातपूर पोलीस करणार अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

व्यावसायिकाच्या मालकीची कार बळजबरीने ताब्यात घेत परत मागितली असता चार लाखांच्या खंडणीची (Extortion) मागणी करणाऱ्या प्रकाश लोंढे टोळीचा (Londhe Gang) (पीएल ग्रुप) ‘जल्लाद’ याच्याविरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

संतोष शेट्टी पवार उर्फ ‘जल्लाद’ याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. धीरज सुभाष शर्मा (४३, रा. शिंदे नगर, मखमलाबाद रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे मोबाईल शॉप आहे. १२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास सातपूर गावात (Satpur Gaon) धीरज शर्मा यांचा भाऊ मनिष शर्मा (३४, रा. कल्याण पश्चिम, जि. ठाणे) हा सातपूर गावात गेला होता. त्यावेळी संशयित जल्लाद याच्यासह त्याच्या तीन साथीदारांनी मनिष शर्मा यास कुरापत काढून शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.

YouTube video player

मनिष यांच्याकडील संशयित जल्लाद याने अल्टो कारची (एमएच १५ एफटी ८८२४) चावी बळजबरीने हिसकावून घेतली आणि कार घेऊन गेला. कार परत मागितली असता, संशयित जल्लाद याने गाडी परत पाहिजे असल्यास चार लाखांच्या खंडणीची मागणी केली. तक्रारदार शर्मा यांनी सातपूर पोलिसात (Satpur Police) तक्रार दिली असता, त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक राहुल नळकांडे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, संशयित जल्लाद हा आयटीआय सिग्नल येथील बारमधील गोळीबार प्रकरणी अटक असून, सध्या तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...