Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Crime : ब्लॅकमेल करून घेतली पन्नास हजारांची खंडणी

Nashik Crime : ब्लॅकमेल करून घेतली पन्नास हजारांची खंडणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्त्रीरोगतज्ज्ञास ब्लॅकमेल (Blackmail) करून पाच लाखांची खंडणी (Extortion) मागून त्यातील पन्नास हजार रुपये स्वीकारणाऱ्या शहरातील एम.जी. न्यूज या अनधिकृत लोकल चॅनलच्या संचालकांवर मुंबईनाका पोलिसांत (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित चॅनल संचालक व पत्रकार मनोहर पाटील व योगेश पाटील यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजली विष्णू धादवड (रा. अमोदिनी, गुरुद्वारारोड, शिंगाडा तलाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांचे सिन्नर व मुंबईनाका येथे ब्लॉसम हॉस्पिटल आहे. दरम्यान, दि. ८ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत त्यांच्या रुग्णालयात सकूबाई शिंदे (रा. सिन्नर) यांच्यावर वैद्यकीय उपचार झाले होते. मात्र, उपचारात हलगर्जीपणा व दिरंगाई केल्याचा दावा करून मनोहर व योगेश पाटील यांनी डॉ. अंजली यांच्यावर आरोप केले. तसेच आमच्याकडे संबंधित रुग्णाच्या (Patient) तक्रारी असल्याचे त्यांना सांगितले.

YouTube video player

दरम्यान, पाटील हे नोंदणीकृत व अधिकृत वृत्तसंस्थेचे वार्ताहर नसताना त्यांनी एम.जी. न्यूज या अनधिकृत न्यूज चॅनलचा पत्रकार वा वार्ताहर असल्याचे सांगून वस्तुस्थिती न दर्शवणारी तथ्यहिन माहिती प्रसारित केली. तसेच वैद्यकीय व्यवसायाबाबत बदनामी करून अंजली यांच्या पतीकडे सेटलमेंटसाठी पाच लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी ५० हजार रुपयांची खंडणी अंजली यांच्या रुग्णालयातील (Hospital) कर्मचारी सागर भांगरे याच्यामार्फत गोल्फ क्लब मैदान येथे स्वीकारली, असे फिर्यादीत नमूद आहे.

डॉ. अंजली या अनुसूचित जमातीच्या तसेच त्यांचे पती दिव्यांग असल्याचे माहीत असताना संशयितांनी (Suspected) सिन्नर व नाशिक येथे करत असलेल्या वैद्यकीय व्यवसायात अडचणी निर्माण व्हाव्यात व काहीतरी आर्थिक गैरलाभ मिळावा म्हणून अनधिकृत चॅनलकरता पेड न्यूज अथवा ठराविक पैसे देण्यास भाग पाडण्यासाठी खंडणी स्वीकारल्याचा दावा अंजली यांनी केला आहे. प्राथमिक तपास सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...