Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : पंचवटी गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

Nashik Crime : पंचवटी गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

कट रचण्यात सहभागी असल्याचे पोलीस तपासात झाले उघड

नाशिक | Nashik

पंचवटी गोळीबार प्रकरणात (Panchvati Firing Case) भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील (Jagdish Patil) यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगारांसोबत बैठक आणि गोळीबाराचा कट रचण्यात स्पष्ट सहभाग असल्याचे उघड झाल्याने पंचवटी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच नांदूर नाका (Nandur Naka) येथील राहुल धोत्रे खून प्रकरणात (Rahul Dhotre Murder Case) भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पंचवटीत झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

YouTube video player

दरम्यान, पाटील यांना अटक केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे नाशकात (Nashik) असतानाच पक्षाच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी अटक केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारे शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत नोंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व इतर व्यवस्थापनाच्या चौथी व सातवीच्या 84 हजार 704 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज...