इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar
इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) दाखल असणाऱ्या खूनाच्या गुन्ह्यात (Murder Case) फरार असणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी (Police) महिन्याभराच्या पाठपुराव्यानंतर गुजरात व नाशिक शहरातून शिफारसीने ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हाशीम रजाउल्ला वारसी (३२), रवीनाथ उर्फ दुर्लभ यादव (२२), साजीद रजाउल्ला वारसी (२६) आणि अरशद हिकमतहुसेन शेख (२२) असे संशयित (Suspected) आरोपींचे नाव आहे. पोलीसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुसे, मोठा सुरा आणि बनावट आधारकार्ड जप्त केले. सर्व संशयित आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कणिक (Sandeep Karnik) उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, परिमंडळ २ चे उपआयुक्त किशोर काळे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईत पोउपनि संतोष फुंदे, संदीप पवार, अमजद पटेल, पवन परदेशी, सागर परदेशी, योगेश जाधव, अमोल कोथमिरे, प्रमोद कासुदे, मुजाहिद सैय्यद आणि चंद्रभान पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे करीत आहेत.




