Friday, January 23, 2026
Homeक्राईमNashik Crime : सातपूर गोळीबार प्रकरणी लोंढे पिता-पुत्रासह चौघांना 'इतक्या' दिवसांची पोलीस...

Nashik Crime : सातपूर गोळीबार प्रकरणी लोंढे पिता-पुत्रासह चौघांना ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक | Nashik

सातपूरच्या (Satpur) हॉटेल ऑरा बारमधील गोळीबार प्रकरणात (Firing Case) पोलिसांनी ‘पीएल’ ग्रुपचे संस्थापक व सातपूर येथील माजी नगरसेवक प्रकाश लोंढे (Prakash Londhe) व त्यांचा पुत्र दीपक ऊर्फ नानाजी यांना बुधवारी रात्री अटक केली होती. यानंतर आज (गुरुवारी) त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

शहर पोलिसांनी (City Police) ऑपरेशन क्लिनअप सुरू केल्याचा फिल नाशिककरांना (Nashik) येत असताना राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ‘बड्यां’च्या मुलांसह नातलग व समर्थक आणि कार्यकर्त्यांवर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे दाखल होताच निसटण्यासाठी लोंढे यांनी वरपर्यंत सेंटींग्जचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र, तत्पूर्वीच प्रकाश लोंढे यांच्यासह दीपकला पोलिसांनी सबळ पुराव्यांनिशी सातपूर गोळीबार प्रकरणात अटक केली. लोंढे यांचा दुसरा पुत्र व सातपूर गोळीबार प्रकरणातील (Satpur Firing Case) मुख्य आरोपी भूषण लोंढे यांच्या शोधासाठी गुन्हेशाखेची चार स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.

YouTube video player

दरम्यान, रविवार (दि. ५ ऑक्टोबर) रोजी पहाटे अडीच वाजता आयटीआय सिग्रलवरील ऑरा बारबाहेर काही तरुणांमध्ये झालेला वाद मिटविणाऱ्या बाऊन्सर्स’ला धक्काबुकी झाल्याने उद‌भवलेल्या ‘प्रोटेक्शन मनी’च्या वादातून गोळीबार झाला होता.यात हल्ल्यात तिवारी नावाचा ग्राहक जखमी झाला होता. यानंतर जीवे ठार मारण्याच्या प्र्यत्नासह खंडणीप्रकरणी माजी नगरसेवकासह मुलगा भूषण प्रकाश लोंढे सह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शुभम पाटील उर्फ भुऱ्या, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अंडागळे हे अटकेत असून, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. यानंतर आज लोंढे पिता-पुत्रासह चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अपहरण कांडामुळे लोंढे गोत्यात

हॉटेल ऑरा बारमध्ये गोळीबारानंतर पीएल’ ग्रुपमधील संशयित लोंढेसह साथीदारांवर गुन्हा नोंद होताच लोंढे टोळीने या बारचे चालक बिपिन पटेल व संजय शर्मा यांच्यासह कुटुंबीयांचे अपहरण करीत त्यांना डांबून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात प्रकाश लोंढेसह त्यांचा मुलगा दीपक, भूषण लोंढे आणि संतोष पवार व अमोल पगारेसह इतरांवर अपहरणासह डांबून ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याही प्रकरणात सातपूर पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...