नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शासकीय कर बुडवण्यासाठी एका संशयिताने दोन आयशर (Eichers) वाहनांना एकच वाहन क्रमांक चिकटवून भंगाराची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन्ही वाहने जप्त करीत संशयित वाहन चालकाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Station) फसवणूकीचा (Fraud) गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : सिंहस्थाच्या तयारीला वेग
गुन्हे शाखा युनिट एकचे (Crime Unit one) पोलिस हवालदार नाझीमखान पठाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी (दि.२) एक्स्लो पॉइंट येथे ही कारवाई केली. एकच वाहन क्रमांकाची प्लेट लावून संशयित दोन व्यावसायिक वाहनांमधून क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक करत असल्याचे पोलिसांना समजले हाेते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, पठाण, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, अमोल कोष्टी व समाधान पवार यांच्या पथकाने सापळा रचून दोन्ही आयशर ट्रक ताब्यात घेतले.
हे देखील वाचा : श्रीलंकेत कांदा निर्यात वाढणार; कांदा आयात शुल्कात २० टक्के कपात
दोन्ही ट्रकवर एमएच ०४ केएफ ७११४ क्रमांकाच्या नंबर प्लेट लावलेल्या आढळून आल्या. संशयित चालकास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अताउल्ला बैतुल्ला चौधरी (रा. अंबडलिंक रोड) असे सांगितले. त्याने वाहनांमध्ये जादा माल भरत शासकीय कर चुकवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तसेच दोन्ही वाहनांमधील स्क्रॅप माल जालना येथे पाठवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी (Police) २५ लाख रुपयांची दोन्ही वाहने जप्त करीत संशयित चौधरी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.