Thursday, March 13, 2025
Homeनाशिकश्रीलंकेत कांदा निर्यात वाढणार; कांदा आयात शुल्कात २० टक्के कपात

श्रीलंकेत कांदा निर्यात वाढणार; कांदा आयात शुल्कात २० टक्के कपात

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

श्रीलंका सरकारने (Government of Sri Lanka) कांद्यावरील (Onion) आयात शुल्क ३० टक्क्यांवरून १० टक्के केल्याने या देशात कांदा निर्यातीत वाढ होणार आहे. नाशिकसह (Nashik) देशातील सुमारे ९ टक्के कांदा श्रीलंकामध्ये निर्यात होतो. बा निर्णयाने नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा

श्रीलंका सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कांदा निर्यातदारांनीदेखील स्वागत केले असून भारतीय (Indian) कांदा श्रीलंकन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात निर्यात होऊन कांद्याला दरही चांगले मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरवर्षी साधारणपणे दीड ते दोन लाख मेट्रिक टन कांदा भारतातून श्रीलंकेत निर्यात होत असतो, मात्र श्रीलंकेने लावलेल्या निर्यात शुल्कामुळे काही प्रमाणात निर्यातीला ब्रेक लागला होता. आता हा अडसर दूर झाल्याने निर्यातीचा वेग वाढेल, असे मत निर्यातदारांनी व्यक्त केले. बांगलादेशनंतर भारताचा सर्वांत मोठा कांदा निर्यातदार देश श्रीलंका आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड

श्रीलंकेने यापूर्वी कांद्याच्या आयातीवर ३० टक्के शुल्क आकारल्यामुळे भारतीय कांदा श्रीलंकेत खूप कमी प्रमाणात निर्यात होत होता. श्रीलंका सरकारने कांदा उत्पादकांसाठी घेतलेला निर्णय भारतातील कांदा उत्पादक शेतक-यांसाठी फायदेशीर आहे. २०२३ मध्ये एकट्या श्रीलंकेत ४१४ कोटींचा १ लाख ७३ हजार ७५४ मेट्रिक टन कांदा निर्यात झाला होता. श्रीलंकेन घेतलेल्या निर्णयाने अधिक कांदा रवाना होईल. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांसाठीच (Farmer) नव्हे तर व्यापारी, मजूर, जहाज कंपन्या यांनाही निर्णय लाभदायक होईल आणि आर्थिक उलाढाल वाढेल, असे मत फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : महायुतीत नाराजी कायम! एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही? सस्पेन्स कायम

भारताने निर्यातीवरील शुल्क हटवा, श्रीलंकेने कांदा आयातीवरील

शुल्क २० टक्क्यांनी घटवून १० टक्के केला. भारताने निर्यातीवरील २० टक्के शुल्क हटविण्याची मागणी कांदा उत्पादक शेतक-यांनी केली आहे. यासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील खासदारांना पत्र देण्याची भूमिका शेतकरी संघटनांनी व्यक्त केली. उन्हाळ कांदा संपुष्टात आला असून लाल खरीप कांद्याची आवक बाजार समितीमध्ये वाढत आहे. परंतु बाजारभावात अल्प प्रमाणात घसरण झाली.सरासरी भाव ३७५१ रुपये मिळाला. लाल कांद्याची आवक वाढत असल्याने दर घसरण्याची शक्यता बाढली आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने निर्यात शुल्क पूर्णतः हटवावे, यासाठी जिल्ह्यातील खासदारांना (MP) पत्र देणार आहोत.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक संपुष्टात आली असून, मंगळवारी नवीन लाल कांद्याची आवक २१ हजार २३८ किंলে झाली, लाल कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ५.३५२ रुपये प्रति किंटल तर सरासरी ३.७५१ रुपये प्रति किंटल दर मिळाला. आवकेत घट झाल्यामुळे बाजारात उपलब्ध कांद्याचे प्रमाण कमी आहे. मागणी तुलनेत पुखठा कमी असल्याने भाव टिकून आहे.

भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

पाच वर्षातील श्रीलंका निर्यात आकडेवारी में टना मध्ये

२०२०-२१: १ लाख ४४ हजार ७१३ मे टस
२०२१-२२ : १ लाख ६२ हजार ९१८ में टन
२०२२-२३ : २ लाख ७० हजार ५०१ में टन
२०२३-२४ : १ लाख ७३ हजार ७५४ में टन
एप्रिल २४ ते सप्टेंबर २४ ५३ हजार ४९२ में टन

पाच वर्षातील श्रीलका नियांत आकडेवारी कोटी मध्ये

२०२०-२१:३१३ कोटी
२०२१-२२ : ४११ कोटी
२०२२-२३ : ४५२ कोटी
२०२३-२४ : ४१४ कोटी
एप्रिल २४ ते सप्टेंबर: २४१ कोटी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...