Wednesday, October 16, 2024
Homeक्राईमNashik Fraud News : लग्नाचे आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक

Nashik Fraud News : लग्नाचे आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक

इंदिरानगर | प्रतिनिधी | Indiranagar

प्रॉव्हिडंट फंडाच्या व्यवहारातून ओळख झालेल्या इसमाने एका महिलेला (Woman) लग्नाचे आमिष दाखवून तिची १२ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Mahayuti Press Conference : “… तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार”; महायुतीच्या नेत्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

फिर्यादी पीडित महिला ही आई, वडील व भाऊ यांच्यासह एकत्र कुटुंबात राहते. पीडित महिला ही सन २०१९ मध्ये सोनई जि. अहमदनगर) येथे एका अकॅडमीमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करीत होती. तेथे असताना दोन हजार रुपये दरमहा वेतनातून भविष्यनिर्वाह निधीसाठी कपात होत होती. परंतु ही महिला एप्रिल २०२२ पासून नाशिक (Nashik) येथे राहण्यासाठी आली व ती नाशिक येथे एका संस्थेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. त्यानंतर परंतु या संस्थेत पीएफ कपात होत नसल्याने आधीची रक्कम परस्पर पीडितेने पीएफ अकाऊंटला जमा करण्याचे ठरविले व त्यासाठी आरोपीने पीएएफ लेबर कल्सल्टंट अजयकुमार नंदकुमार चिंचोळकर (रा. शालिमार, नाशिक) यांच्याशी संपर्क केला.चिंचोळकर याने या पीडितेला पीएफ अकाऊंटमध्ये पैसे (Money) जमा करण्याचे सांगून भविष्यात चांगले पेन्शन मिळेल, असे सांगितले.

हे देखील वाचा : Mahayuti Press Conference : महायुतीचे ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित; कुठे केली गुंतवणूक, कोणती कामे केली?

त्यानुसार पीडितेने दरमहा ४ हजार १७५ रुपये रोखीने, तसेच फोन पे वगैरेने चिंचोळकर यांच्या फोन पेवर पाठवीत होती. फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपी चिंचोळकर याने मुंबई-आग्रा हायवेवरील हॉटेल गेस्ट हाऊसमध्ये नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून पीडितेकडून वेळोवेळी एकूण ५ लाख रुपये फोन पे व रोख स्वरूपात घेतले.या पैशांबाबत विचारणा केली असता चिंचोळकर याने पैसे परत न करता पीडितेशी वाद घातला, तसेच तुझे अश्लील व्हिडिओ माझ्याकडे आहेत. ते मी व्हायरल करून टाकीन, अशी धमकी पीडितेला देण्यास सुरुवात केली. या धमकीला घाबरून पीडितेने तिच्या भावाच्या क्रेडिट कार्डावरून ४० हजार रुपये काढून दिले होते, तसेच विविध कारणे सांगून आरोपी पीडितेकडून पैसे उकळत होता. पीडितेचे आतापर्यंत एकूण ११ लाख ९० हजार रुपये उकळले होते.

हे देखील वाचा : मुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, पीडितेचे पुणे (Pune) येथील तरुणाशी लग्न झाले होते. मात्र पीडितेच्या फोनवर (Phone) पर्सनल लोनचे थकित हप्ते भरण्याकरिता वारंवार फोन येऊ लागल्याने ते पीडितेच्या पतीच्या लक्षात आले. त्याने याबाबत विचारणा केली असता त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर पीडिता ही नाशिक येथे माहेरी निघून आली. त्यानंतरही आरोपी चिंचोळकर याने पीडितेशी संपर्क साधून तिला धमकी दिली. हा प्रकार २०२२ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अजयकुमार चिंचोळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या