Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : पोलीस भरतीत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून उमेदवाराकडून उकळले अडीच...

Nashik Crime : पोलीस भरतीत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून उमेदवाराकडून उकळले अडीच लाख

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलिस भरती उत्तीर्ण करून देतो असे आमिष दाखवून एकाने तरुणाकडून (Youth) २ लाख ७५ हजार रुपये घेतले. मात्र तरुण उत्तीर्ण न झाल्याने तसेच पैसे परत न मिळाल्याने तरुणाने आडगाव पोलिस ठाण्यात (Adgaon Police Station) फसवणूकीची (Fraud) फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान भाऊसाहेब मते (२९, रा. ता. चांदवड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित रामनाथ ठकाजी पवार (रा. लोकधारा सोसायटी, नाशिक) याने डिसेंबर २०२२ मध्ये गंडा घातला. पोलिस भरतीत उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवून पवार याने २ लाख ७५ हजार रुपये घेतले.

त्यानंतर परिक्षा उत्तीर्ण (Pass) न झाल्याने मते यांनी पवारकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे पवारने धनादेश दिला, मात्र तो बँकेत वटला नाही. त्यामुळे पवार विरोधात फसवणूकीची फिर्याद (FIR) दाखल करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...