नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
मैत्री, विश्वास आणि आर्थिक व्यवहार यांची गुंतागुंत अनेकदा धोकादायक वळण घेते याचे उदाहरण नाशिकमधून (Nashik) समोर आले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market Investment) केल्यावर मोठा नफा मिळवूनही अधिक पैशांच्या हव्यासापोटी एका तरुणाने चक्क शेअर ट्रेडर असलेल्या मित्राच्या वडिलांचे अपहरण केल्याची घटना गंगापूररोड भागात घडली. दरम्यान, अपहृत वडिलांची सुखरूप सुटका झाली असून संशयित चेतन अशोक देशमुख (रा. ध्रुवनगर, गंगापूररोड) याच्या अटकेसाठी गंगापूर पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Nashik News : पंधरा दिवसांपूर्वी वडिलांचा अपघाती मृत्यू अन् नंतर मुलाची आत्महत्या; नाशिकमध्ये हळहळ व्यक्त
तक्रारदार तेजस सुरेश चांदवडकर (२५, रा. शिवशक्ती, त्र्यंबकराजनगर, गंगापूररोड) व चेतन देशमुख (रा. शनिमंदिराजवळ, ध्रुवनगर) हे दोघे मित्र (Friend) आहेत. तेजस हा शेअर ट्रेडिंगमध्ये कार्यरत असून शेअर ब्रोकिंग व मार्केट ट्रेडिंगमध्ये त्याला अनुभव आहे. याच अनुभवावर विश्वास ठेवून ऑगस्ट २०२५ मध्ये चेतन देशमुख याने त्याच्याकडे आर्थिक गुंतवणूक केली होती. चेतनने तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली. काही महिन्यांतच चांगला परतावा मिळाला.
हे देखील वाचा : Nashik Politics : खासदार संजय राऊतांनी मंत्री महाजन अन् आमदार ढिकले यांच्यातील संभाषणाचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर; नेमकं काय म्हटलंय?
तेजसने १ कोटी ४१ लाख ३० हजार रुपये चेतनला परत केले. म्हणजेच सुमारे ३० लाख ३० हजार रुपयांचा (Moeny) नफा त्याला मिळाला. तरीही संशयित चेतन देशमुखचे समाधान झाले नाही. अधिक नफ्याच्या लालसेपोटी त्याने तेजसकडे आणखी ८० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली. मात्र त्याने नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद वाढत गेला. यानंतर ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत चेतनने तेजसला बोलावून धमकी दिली व त्याची आठ लाखांची महिंद्रा थार हिसकावून कब्जा केला. तसेच ८० लाखांची खंडणी (Extortion) मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ लिहून दिव्यांग युवतीने संपवलं जीवन; नेमकं कारण काय?
किडन्या वीक अन् पैसे दे…
चेतनने ८० लाख रुपयांची खंडणी मागितली असता तेजसने नकार दिला. तेव्हा ‘किडन्या विक आणि पैसे देच’ अशी धमकी दिली. तर १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दोन वाजता तेजसचे वडील सुरेश राजाराम चांदवडकर यांना बिटको येथील इंडियन ओव्हरसिज बँकेजवळ गाठून त्यांना कारमध्ये बसवत अपहरण करत छत्रपती संभाजीनगर रोडने नेले. त्यांच्याकडेही ८० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली, असे नमूद केले आहे. तपास सहायक निरीक्षक तुषार देवरे करत आहेत.




