नाशिक | प्रतिनिधी | Nashik
वस्तू व सेवा कर विभागाच्या (जीएसटी) डीजीजीआय पथकाने नाशिकमध्ये (Nashik) शनिवारी (दि. २६) सकाळी गेमिंग ॲप डेव्हलपरच्या घरावर टाकलेल्या छाप्यात (Raid) अधिकृतरित्या तब्बल सहा कोटी ७० लाख रुपयांची रोकड जमा केली आहे. श्रीकांत प्रसाद पऱ्हे (रा. कपालेश्वर सोसायटी, नाशिकरोड, मूळ रा. अहिल्यानगर) असे संशयित आयटी इंजिनिअरचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली असून, पुणे न्यायालयाने (Pune Court) तीन दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावली आहे. ऑनलाइन गेमिंग ॲपच्या विक्रीतून करचोरी केल्याच्या आरोपानुसार ही कारवाई झाल्याचे समजते. दोषारोप दाखल होईल तेव्हाच प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो.
जीएसटी विभागाच्या (GST Department) गुप्तचर पुण्यातील महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) अधिकाऱ्यांना नाशिक मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून (Software Engineer) करचुकवेगिरी सुरू असल्याचा सुगावा लागला होता. त्यानुसार डझनभर अधिकायांच्या पथकासह नाशिक जीएसटीचे अधिक्षक मनोज चौधरी व इतरांनी शनिवारी (दि. २६) सकाळी नाशिकरोडयेथील आर्टिलरी रोड परिसरातील कपालेश्वर सोसायटीत पऱ्हे याच्या घर व कार्यालयावर छापा टाकला. राज्यात तीन ठिकाणी पन्हे याच्या कंपन्या असून, त्यामार्फत सॉफ्टवेअर डेव्हल्पिंग, गेमिंग ॲपची कार्यप्रणाली सुरु होती. दरम्यान, विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी उपनगर पोलिसांत (Upnagar Police) गुन्हा दाखल आहे. करचोरी व इतर संबंधाने जीएसटीच्या पुणे येथील न्यायकक्षेत गुन्हा दाखल झाला आहे.
२८ टक्के जीएसटी पुढे?
ऑनलाइन गेमिंग ॲपवर २८ टक्के जीएसटी भरावा लागतो असे नियम आहेत. मात्र, संबंधित इंजिनीअरने बनावट इन्व्हॉईस, पावत्यांद्वारे करचोरी केल्याची माहिती तपासात समोर येते आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनी नऊ तासांच्या झडतीनंतर पन्हे याला ताब्यात घेतले. त्याच्या घर व कार्यालयातून ६ कोटी ७० लाखांची रोकड जप्त केली. विनापखाना पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, कागदपत्रे, संगणक, सर्व्हर, हार्डडिस्क, पेनड्राइव्ह ही सामग्रीही हस्तगत करण्यात आली. पन्हे याच्यासमवेत आणखी एका इंजिनीअरलाही ताब्यात घेतल्याचे कळते.




