Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Crime : नाशिकचे लाचखोर राज्यात 'नंबर वन'; यंदाही पुणे, संभाजीनगरला टाकले...

Nashik Crime : नाशिकचे लाचखोर राज्यात ‘नंबर वन’; यंदाही पुणे, संभाजीनगरला टाकले मागे

सन २०२५ मध्ये १३८ गुन्हे

नाशिक | भारत पगारे | Nashik

टेबलाखालून मलई खाण्यात नाशिकचेच लाचखोर दाखल गुन्ह्यांनुसार (Bribery Cases) पुन्हा एकदा राज्यात अव्वल ठरले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सन २०२५ मध्ये महाराष्ट्रभर रचलेल्या सापळा कारवायांमध्ये नाशिक परिक्षेत्राने धक्कादायक आघाडी घेतली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांना मागे टाकत नाशिकमध्ये १३८ लाचखोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यात २१० संशयितांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे सन २०२४ मध्येही नाशिक आघाडीवर होते. यंदाही ही ‘परंपरा’ कायम राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यभरातील आठही परिक्षेत्रांच्या आढाव्यानुसार, लाचखोरी प्रकरणांत नाशिक पहिल्या क्रमांकावर, तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर अनुक्रमे पुढील स्थानांवर आहेत. पुणे परिक्षेत्रात १२४ गुन्हे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १०९ गुन्हे नोंदविण्यात आले.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर

मुंबई परिक्षेत्रात ४२, ठाण्यात ८३, अमरावतीत ७३, नागपुरात ५४, तर नांदेड परिक्षेत्रात ५९ प्रकरणे समोर आली आहेत. एसीबीच्या (ACB) आकडेवारीनुसार बहुतांश सापळे शासकीय कामे, प्रमाणपत्रे, बांधकाम परवानग्या, महसूल व पोलीस यंत्रणे शी संबंधित कामांमध्ये लाच मागितल्याच्या तक्रारींवरून रचण्यात आले. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांत तक्रारदारांना ‘काम अडवून ठेवण्याची’ भीती दाखवून लाच मागितली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकमध्ये सलग दुसऱ्या वर्षी लाचखोरीचे प्रमाण सर्वाधिक राहणे ही बाब शहराच्या प्रतिमेसाठी धक्कादायक असून एसीबीच्या कारवाया वाढत असल्या तरी, तक्रारींचा ओघ हे भ्रष्टाचाराचे मूळ अजूनही खोलवर रुजल्याचेच द्योतक असल्याचे दिसते.

हे देखील वाचा :  Nashik Politics : महापालिका निवडणुकीत लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील दोन डझन नवखे उमेदवार रिंगणात

सोळा गुन्हे घटले

सन २०२४ मध्ये नाशिक परिक्षेत्रांतील (Nashik Division) पाचही जिल्ह्यांत १५४ गुन्हे नोंद होते. तर सन २०२५ मध्ये १३८ गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार तुलनेने केवळ १६ गुन्ह्यांची घट असून गतवर्षीच्या १३८ गुन्ह्यांपैकी ८१ गुन्हे तपासांवर प्रलंबित असून २९ प्रकरणांचे दोषारोष पत्र न्यायालयात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे जानेवारी आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत लाचखोरीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे.

सन २०२५ एसीबी कारवाई (परिक्षेत्रनिहाय )

नाशिक १३८ गुन्हे २१० संशयित
पुणे १२४ गुन्हे १८१ संशयित
छ.संभाजीनगर १०९ गुन्हे १६० संशयित
मुंबई ४२ गुन्हे ६५ संशयित
ठाणे ८३ गुन्हे १२५ संशयित
अमरावती ७३ गुन्हे १०२ संशयित
नागपूर ५४ गुन्हे ७८ संशयित
नांदेड ५९ गुन्हे ८८ संशयित

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रातून आता पावसाचे अपडेट

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे लहरी, खराब हवामानामुळे शेतकर्‍यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प...