नाशिक | प्रतिनिधी | Nashik
धात्रक फाटा (Dhatrak Phata) परिसरातील बंद घराच्या पाठीमागील दाराची जाळी तोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. सचिन सुरेश सोनवणे (रा. आशापुरा सोसायटी, धात्रक फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, लग्न सोहळ्यासाठी ते कुटूंबियांसह विक्रोळी येथे रविवारी (दि. २४) पहाटे गेले. त्यांनतर चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दाराची जाळी तोडून आत प्रवेश केला आणि बेडरुममधील कपाटातील ६० हजारांची रोकड, दीड लाखांची सोन्याची पोत, ८० हजारांची सोन्याची अंगठी, ६६ हजारांचे कानातील टॉप्स असा ३ लाख ५८हजार २११ रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. म्हसरुळ पोलिसात (Mhasrul Police) गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरी घरफोडीची घटना सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीत घडली. संकठा वंशराज यादव (रा. शिवशक्ती रो हाऊस, सोमेश्वर कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. २५) ते बाहेर गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून ३ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेत घरफोडी केली. यात सोन्याच हार, सोन्याच्या बांगड्या, कानातले टॉप्स, सोन्याची नथ, अंगठ्या, बुंदा, सोन्याची चैन, चांदीचे दागिने (Jewelry) असा ऐवज चोरीला गेला. सातपूर पोलिसात (Satpur Police) गुन्हा दाखल आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा