Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : एमडीच्या बाजारात 'दहशत'; मेफेड्रोनची विक्री करताना पती-पत्नी एनडीपीएसच्या जाळ्यात

Nashik Crime : एमडीच्या बाजारात ‘दहशत’; मेफेड्रोनची विक्री करताना पती-पत्नी एनडीपीएसच्या जाळ्यात

नाशिक | Nashik

मुंबईतील विविध भागांतून मॅफेड्रॉन (एमडी) नाशिकमध्ये (Nashik) आणून छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अमली पदार्थ विरोधी पथकाने पुन्हा एकदा धक्कादायक बाब समोर आणली आहे. एमडी तस्करीत पती-पत्नीचा थेट सहभाग उघडकीस आला असून, सराईत गुन्हेगारासह त्याच्या पत्नीला अटक करत पोलिसांनी पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने रविवारी (दि. २१) मध्यरात्री माहितीच्या आधारे सापळा रचत फरहान कलीम शेख उर्फ ‘दहशत’ (२८, रा. नायकवाडीपुरा, जुने नाशिक) आणि त्याची पत्नी मरीयम फरहान शेख उर्फ मनीषा (२८) यांना रंगेहाथ अटक केली. कारवाईदरम्यान त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचे एमडी तसेच २ लाख ५४ हजार रुपयांचा इतर मुद्देमाल असा साठा हस्तगत केला. पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांच्यासह सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, तसेच अंमलदारांच्या विशेष पथकाने अत्यंत गोपनीयतेने कारवाई केली.

YouTube video player

दरम्यान, अटक (Arrested) करण्यात आलेला फरहान उर्फ दहशत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात तीन, तर अंबड पोलीस ठाण्यात एक गंभीर गुन्हा दाखल आहे. पूर्वी गंभीर गुन्ह्यांमुळे त्याला तडीपारही करण्यात आले होते. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये एमडी तस्करीत महिलांचा सहभाग वाढत असल्याचे चित्र सातत्याने समोर आले आहे.

तस्करीत आठ महिला

गतवर्षी नाशिकरोड हद्दीत एका दाम्पत्याला अटक झाली होती. आतापर्यंत सातपेक्षा अधिक महिलांना एमडी विक्री व तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महाविद्यालयीन तरुण, बेरोजगार युवक, सराईत गुन्हेगार आणि काही महिला यांचा नशेच्या काळ्या बाजारातील सहभाग नाशिकसाठी गंभीर सामाजिक इशारा ठरत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून पुढील तपास सुरू असून, या साखळीमागील मुंबईतील पुरवठादार व आर्थिक नेटवर्क उघड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...