Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Crime : पत्नीला मित्राला भेटायचे आहे असे सांगून घाटात नेले अन्…;...

Nashik Crime : पत्नीला मित्राला भेटायचे आहे असे सांगून घाटात नेले अन्…; पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon

पत्नीला (Wife) मित्राला भेटायचे आहे, असे सांगून परधडी घाटात नेऊन पतीने (Husbend) पत्नीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर मालेगाव (Malegaon) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पतीविरूद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पतीला गजाआड केले आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार (दि.११ सप्टेंबर) रोजी येवला येथून गोविंद माळी याने मित्राला (Friend) भेटायला जायचे आहे, असे सांगून पत्नी राणी गोविंद माळी (२०, रा. कोटमगाव विठ्ठलाचे ता. येवला, जि. नाशिक) हिला नांदगाव तालुक्यातील परधडी घाटात (Pardhadi Ghat) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जात असताना घाटातील निर्जनस्थळी नेले. यावेळी गोविंद माळी यानी दुचाकी थांबवत चाकू काढून पत्नीच्या गळ्यावर, पोटावर, पाठीवर आणि कमरेवर सपासप वार करत हल्ला केला.

YouTube video player

त्यानंतर जखमी (Injured) झालेल्या पत्नीला गोविंद माळी हा घाटातील निर्जनस्थळी टाकून मोटारसायकलवरून पसार झाला. शुक्रवार (दि.१२) सकाळच्या सुमारास परधडी गावातील ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेली राणी रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसून आली. यानंतर परधडी ग्रामस्थांनी तत्काळ एका वाहनातून तिला नांदगाव ग्रामीण रुग्णालय (Nandgaon Rural Hospital) येथे उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर पीडितीने पोलिसांसमोर घडलेल्या घटनेची माहिती दिली.

दरम्यान, तिच्या जबाबावरून नांदगाव पोलीस ठाण्यात पती गोविंद माळी याच्याविरोधात खूनाचा (Murder) प्रयत्न केल्याचा गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पती गोविंद माळी यास येवल्यातून ताब्यात घेत अटक केली असून, नांदगाव पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडितेवर मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बढे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...