Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; गळफास घेत नंतर पतीने स्वत:लाही...

Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; गळफास घेत नंतर पतीने स्वत:लाही संपवलं

पळाशी | प्रतिनिधी | Plashi

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) सावरगाव जवळील मन्याड नदीवरील पुलाच्या पुढे व हातगाव तालुका चाळीसगाव शिवारात चारित्र्याच्या संशयावरून (Suspicion of Character) पत्नीचा (Wife) दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून करत पतीनेही आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मृत पतीच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय सुखदेव चव्हाणके आणि वर्षा विजय चव्हाणके असे मयतांचे नाव आहे. मयत विजय हा पत्नी,मुले व आईवडील यांच्यासमवेत हातगाव ता.चाळीसगाव शिवारातील (Chalisgaon Shivar) शेतात राहत होते. विजय याचे दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे त्याचे आणि त्याच्या पत्नीचे कौटुंबिक कारणातून वाद होत असे, यातून तो पत्नी वर्षा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

YouTube video player

सोमवार (दि.२ जून) रोजी सकाळी ११.२५ वाजेच्या सुमारास विजय चव्हाणके याने आपला मोठा भाऊ अशोक सुकदेव चव्हाणके यांना फोन करून मी माझ्या पत्नी वर्षाला संपवले असून, मी सुद्धा माझ्या जीवाचे बरे वाईट करणार असल्याचे सांगितले. या घटनेने हादरलेल्या अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय चव्हाणके व त्याची पत्नी वर्षाच्या शोधासाठी शेतात धाव घेतली असता शेताच्यामध्ये असलेल्या बांधावरील आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तर त्याची पत्नी वर्षा शेतातील जनावरांच्या असलेल्या चाऱ्यामध्ये मयत अवस्थेत आढळून आली. यावेळी तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती.

त्यानंतर अशोक सुकदेव चव्हाणके यांनी आपला भाऊ विजय हा त्याची पत्नी वर्षा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तिचा दोरीने गळा आवळून खून केला. तसेच त्याने सुद्धा शेताच्या बांधावरील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद दिली. तर मयत विजय चव्हाणके याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात (Chalisgaon Rural Police Station) भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी फॉरेन्सिक टीम व चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरूळे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीणचे निरीक्षक राहूलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल राजपूत, हवालदार ओंकार सुतार व टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेचा पंचनामा करून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...