Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : पतीने केला पत्नीचा खून; पंचवटीतील रामकुंड परिसरातील घटना, कारण...

Nashik Crime : पतीने केला पत्नीचा खून; पंचवटीतील रामकुंड परिसरातील घटना, कारण काय?

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

रामकुंडकडे (Ramkund) जाणाऱ्या उत्तमराव ढिकले मार्गावर गुरुवारी (दि. ११) रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच सुमारास पतीने आपल्या पत्नीचा (Husband and Wife) गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. सदर महिला व तिची सासू ही विधी कर्म करताना सहाय करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत असल्याने रामकुंड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पतीने चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शितल नितीन भामरे (वय ३०) असे मयत पत्नीचे नाव आहे. तर नितीन भामरे असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. पंचवटीतील (Panchvati) रामकुंडाकडे इंद्रकुंड उतारावरील उत्तमराव ढिकले मार्गवर रस्त्यालगत मयत शीतल ही सासू सासरे नवरा असे राहत होते. नवरा हा गंजडी होता. तर सासरा हा भिक्षा मागत असे तर शीतल व तिची सासू ही रामकुंडावर विधी कर्म करताना साहाय करण्याचे काम करीत असे. बऱ्याच दिवसांपासून मयत शीतल व पती नितीन यांच्यात वाद सुरू होते. यानंतर आज सकाळपासून देखील दोघांत भांडणे चालू होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पतीने पत्नीचा खून (Murder) केल्याची माहिती समोर आली आहे.

YouTube video player

दरम्यान, आज गुरुवार (दि.११) रोजी सुमारे चार वाजेच्या सुमारास घर बंद असल्याने आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी मयत शीतल हिच्या गावाकडे गेलेल्या सासू आणि सासरे यांना फोन (Phone) करून कळविले. यानंतर मयत शीतल हिची नणंद सटाण्याहून आली आणि सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घराचे कुलूप तोडले. त्यावेळी शीतल ही मृत अवस्थेत आढळून आली. त्यानंतर ही घटना एका सुजान नागरिकांनी पंचवटी पोलिस ठाण्यास (Panchvati Police Station) कळविली. यावेळी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर घटनास्थळी परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्ता मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी पाहणी केली.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...