Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : टेरर फंडिंगच्या नावे 'डिजिटल अरेस्ट'; वयोवृद्ध उद्योजकाकडून तोतया पोलिसांनी...

Nashik Crime : टेरर फंडिंगच्या नावे ‘डिजिटल अरेस्ट’; वयोवृद्ध उद्योजकाकडून तोतया पोलिसांनी उकळले ६६ लाख

बँक खाते साफ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशविघातक कृत्यात सहभागी असल्यासह दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद (टेरर फंडिंग) पुरवल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) पोलिसांच्या (Police) वेशात शहरातील वयोवृद्ध उद्योजकास ‘डिजिटल अरेस्ट’ करून तब्बल ६६ लाखांचा गंडा घातला. विशेष म्हणजे चोरट्यांनी वयोवद्धाचे संपूर्ण बैंक खाते साफ केल्यावर पुन्हा ४० लाखांची मागणी करत दम भरला. आता नाशिक शहर सायबर पोलीस (Nashik City Cyber Police) गुन्ह्याचा तपास करत आहेत.

- Advertisement -

८७ वर्षीय वृद्ध एका कंपनीतून सेवानिवृत्त असून, सध्या व्यवसाय करून कंपनी (Company) चालवत आहे. दरम्यान, २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ते नियमित कामकाज करत असताना एका व्हॉटस्अॅपवरून फोन आला. त्यानंतर आलेल्या व्हिडिओ कॉलमधून बोलणाऱ्या संशयितांनी मुंबई पोलीस दलासह एटीएसमधून बोलत असल्याचे भासवले. तसेच पोलीस ठाण्याचे कामकाज दाखवून वरिष्ठ निरीक्षकाचे दालन, वर्दी दाखवून तुम्ही टेरर फंडिंग केली आहे, मनी लॉन्ड्रिंगचे बरेचसे पुरावे आम्हाला मिळाले आहेत. आता तुम्हाला अटक करण्याचे वॉरंट न्यायालयाने बजावले असून, कारवाई सुरू केली आहे, असे सांगितले.

YouTube video player

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार व्हिडिओ कॉलवर घडत असताना बोलणाऱ्या संशयित सायबर संशयितांनी वृद्धाकडून हमीपत्र म्हणजेच अंडरटेकिंगही लिहन घेतले. यानंतर अटक (Arrested) टाळायची असेल व गुन्ह्याच्या तपासासाठी आम्ही दिलेल्या बँक खात्यात रक्कम वर्ग करा, असे बजावले. अखेर भीतीपोटी वृद्धाने वरील पंधरा दिवसांत एकूण ६६ लाख ४७ हजार रुपये विविध बँक खात्यांत वर्ग केले. त्यानंतर बँक खाते झिरो झाल्याचे वृद्धाने सांगितले असता पुन्हा ४० लाख रुपयांची मागणी संशयितांनी केली. अखेर वृद्धाने सोसायटीत राहणाऱ्या शेजाऱ्यास खोटे कारण सांगून उसने पैसे मागितले. याबाबत फसवणुकीसह अॅक्टअन्वये गुन्हा दाखल असून तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत.

सजग सहकाऱ्यामुळे फसवणूक उघड

संशयितांना आणखी ४० लाख रुपये द्यायचे असल्याने वृद्धाने सोसायटीतील एका ज्येष्ठ सहकाऱ्याकडे काही कामानिमित्त २० लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा या सहकाऱ्याने त्यांच्या घरात येऊन कारण विचारले. तेव्हा वृद्धाने सांगण्यास नकार दिला. मात्र, त्याचवेळी त्याला घरातील टेबलवर एक हमीपत्र दिसले. त्याने वाचले असता त्यालाही धक्काच बसला. या सजग सहकाऱ्यास हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्याने वृद्धास धीर देऊन फसवणूक झाल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर वृद्धाने सायबर पोलीस ठाणे गातून व्हॉटस्अॅप ८९४२९५७३२९ या नंबखरून बोलणाऱ्या तोतया पोलिसांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

अशी टाळता येते डिजिटल अरेस्ट

  • अशाप्रकारे अटकेसाठी पोलीस दल फोन करत नाही.
  • फोन, व्हिडिओ कॉल आलेच तर जवळच्या पोलीस ठाण्यात जावे.
  • कोणत्याही बँक खात्यात पैसे भरू नये, घाबरू नये.
  • कितीही भीती दाखवली तरी थेट कॉल बंद करावा.
  • घाबरून न जाता पोलिसांना किंवा नातलगांना माहिती द्यावी.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...