Thursday, January 8, 2026
Homeक्राईमNashik Crime : सात ते नऊ वाजेदरम्यान सोनसाखळी चोरी; महिलावर्गात भितीचे वातावरण

Nashik Crime : सात ते नऊ वाजेदरम्यान सोनसाखळी चोरी; महिलावर्गात भितीचे वातावरण

दोन लाखांचे दागिने पळवले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (Nashik City) पुन्हा एकदा भिवंडी, नाशिक, श्रीरामपूर व आंबिवलीतून आलेल्या सराईत चेनस्नॅचर्सने (Chainsnatchers) नाशिककर महिलांच्या (Woman) उरात धडकी भरवली आहे. दुचाकी आणि पायी आलेल्या या चोरट्यांनी रस्त्याने जाणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातील एकूण दोन लाख नऊ हजार रुपयांच्या सोनसाखळ्या रविवारी (दि.३०) ओरबाडून नेल्या आहेत. विशेष म्हणजे जबरी चोरीच्या या घटना वेगवेगळ्या भागांत घडल्या असून, चोरट्यांनी हे गुन्हे करण्यासाठी सायंकाळी सात ते रात्री सव्वा नऊच्या दरम्यानची वेळ निवडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, विविध सीसीटीव्ही फुटेजनुसार संशयितांचा (Suspected) माग काढला जात आहे.

- Advertisement -

चेनस्नॅचिंगची पहिली घटना, गंगापूर रोडवरील (Gangapur Road) शांतिनिकेतन चौकात शनिवारी (दि. २९) रात्री सव्वा सातच्या सुमारास घडली. कविता राजीव आबड (वय ५३, रा. ऋषिराज होरायझन, शांतीनिकेतन चौक, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या नातवासोचत शांतीनिकेतन चौकातून पायी जात होत्या. येथील अपोलो मेडिकलसमोर आल्या असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ५५ हजारांची सोन्याची पोत जोरात हिसकावून प्रसाद सर्कलच्या दिशेने पळ काढला. गंगापूर पोलिसात जबरी चोटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरी घटना इंदिरानगर पोलिसांच्या हद्दीतील राजसारथी सोसायटी जवळील वनसंपदा सोसायटीजवळ (दि. २९) रात्री आठ वाजता घडली. गोकर्णा वैजिनाथ कदम (२७, रा. राजसारथी सोसायटी, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, लहान मुलगा व सासू यांच्यासह त्या पायी जात असताना वनसंपदा सोसायटीजवळील गार्डनच्या चौफुलीवर आले.

YouTube video player

त्याचवेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने (Theft) गोकर्णी यांच्या गळ्यातील ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून रथचक्रसोसायटीच्या दिशेने पळ काढला. इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर तिसरी घटना पंचवटीतील (Panchavati) दंत महाविद्यालयासमोर (दि. २९) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. मनीषा दिलीप पवार (५०, रा. ओसीओबंगला, केवडीबन, तपोवन) यांच्या फिर्यादीनुसार, त्या आई विमल सांगलीकर यांच्या समवेत स्वामीनारायण मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे पायी जात होत्या. पंचवटी दंत महाविद्यालयाजवळील विव्हियाना सोसायटीजवळील सर्व्हिस रोडवरुन जातानाच त्यांच्या पाठीमागून २५ वर्षीय संशयित चोरटा आला. त्याने मनिषा यांच्या आईच्या गळ्यातील ९४ हजार ५०० रुपयांची सोन्याची पोत व चेन जबरीने हिसकावून कन्नमवार पुलाखाली दुचाकी घेऊन थांबलेल्या साथीदारासमवेत पळ काढला. त्यानंतर दोघे दुचाकीवरून अमरधामच्या दिशेने पसार झाले. आडगाव पोलिसात (Adgaon Police) गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे

  • सराईत पुन्हा सक्रिय
  • २६ ते ५५ वयोगाटातील विवाहित महिला लक्ष्य
  • चोरीसाठी सीसीटीव्ही नसलेल्या परिसरात रेकी
  • दुचाकी व मोपेड बाईकचा चोरट्यांकडून वापर
  • वाहनांना नंबर नाही, काही वाहनांचे नंबर अंधूक
  • सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी
  • महिलांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन
  • चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

ताज्या बातम्या

AMC Election : शिवसेनेचा गड की भाजप-राष्ट्रवादीची मुसंडी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगरच्या मध्यवर्ती शहराचा भाग हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात शिवसेनेला सोबत घेऊनच यापूर्वी भाजपला काही प्रमाणात यश मिळाले होते....