Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik Crime : सोळा लाखांचे दागिने लंपास; शहरात धाडसी घरफोडी

Nashik Crime : सोळा लाखांचे दागिने लंपास; शहरात धाडसी घरफोडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहराच्या मध्यवर्ती भागातील मायको सर्कल परिसरात (Myco Circle Area) धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली असून, पुणे येथे गेलेल्या व्यावसायिकाच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. किचनमधील खिडकीचे ग्रील तोडून घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे तब्बल १६ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना साधू वासवानी रोडवरील कोमल रेसिडेन्सीत राहणाऱ्या सुरेखा संतोष नहार यांच्या घरी घडली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

YouTube video player

नहार या कुटुंबासह (Nahar Family) पुणे (Pune) येथे गेल्या होत्या. हाच फायदा घेत चोरट्यांनी १५ ते २३ जानेवारी रोजी ही घरफोडी केली. चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या किचनमधील खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटे, ड्रॉवर उचकून सोन्याच्या मंगळसूत्र, हार, बांगड्या, अंगठ्या, कानातले, चेन तसेच चांदीचे दागिने, लॅपटॉप, रोख रक्कम असा सतरा लाखांचा ऐवज चोरून नेला. नहार कुटुंबीय पुण्याहून परतल्यानंतर घराचे कुलूप उघडताच घर- ातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : अखेर ठरलं! महापालिकेत ‘हा’ नगरसेवक सांभाळणार भाजपची धुरा

कपाटे उघडी, दागिन्यांचे बॉक्स रिकामे आणि खिडकीचे ग्रील तुटलेले आढळून आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या (Sarkarwada Police Station) पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरू असून, शेजारील नागरिकांकडून माहिती घेतली जात आहे. शहराच्या मध्यवस्तीतील या धाडसी घरफोडीमुळे नागरिकांमध्ये घबराट पस-रली असून, सरकारवाडा पोलिसांनी सकाळी, दुपारी आणि रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : नव्या महापौराची ‘या’ तारखेला होणार निवड, कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...