Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Nashik Crime : अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दत्तनगर येथील माऊली चौकातील मोबाईल दुकान फोडून दुकानातील लॅपटॉप व मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन संशयिताला (Suspected) अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

- Advertisement -

संजय रमेश शर्मा (२३, व्यवसाय मोबाईल दुकान, रा. माऊली चौक, दत्तनगर नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार (दि. २४) रात्री दहा ते सकाळी सात वाजेच्यादरम्यान त्यांच्या दुकानातून अज्ञाताने एक लॅपटॉप, तीन मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case) करण्यात आला होता.

YouTube video player

या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे अंमलदार अनिल गाढवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या चोरीतील संशयित हा कार्तिकी नगर, जाधव संकुल येथे एक लॅपटॉप व मोबाईल फोन (Mobile Phone) विक्रीसाठी येणार आहे. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली.

त्यानंतर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळकर, हवालदार योगेश देसले, अंमलदार अनिल गाढवे, सचिन करंजे, तुषार मते, मयूर पवार, संजय सपकाळे यांच्या पथकाने सापळा रचून एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता एक लॅपटॉप, तीन मोबाईल व साडेचार हजार रुपये रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी (Police) त्याच्याकडून ४९ हजार, ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...