Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Crime : सातपूर गोळीबारप्रकरणी लोंढे पिता-पुत्र अटकेत

Nashik Crime : सातपूर गोळीबारप्रकरणी लोंढे पिता-पुत्र अटकेत

रामवाडी फायरिंगमध्ये अजय बागुलवरही टाच

नाशिक | Nashik

सातपूरच्या (Satpur) ऑरा बारमधील गोळीबार प्रकरणात (Firing Case) पोलिसांना पूर्वनियोजित कटाचे पुरावे मिळाल्याने अखेर गुन्हे शाखेने ‘पीएल’ ग्रुपचे संस्थापक व सातपूर येथील माजी नगरसेवक प्रकाश लोंढे (Prakash Londhe) व त्यांचा पुत्र दीपक ऊर्फ नानाजी याला बुधवारी रात्री अटक केली. दरम्यान, रामवाडी ते विसेमळा मार्गावर चार दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबारात भाजपचे नेते सुनील बागुल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागुल याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून त्याचा व साथीदारांचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

शहर पोलिसांनी ऑपरेशन क्लिनअप सुरू केल्याचा फिल नाशिककरांना (Nashik) येत असताना राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ‘बड्यां’च्या मुलांसह नातलग व समर्थक आणि कार्यकर्त्यांवर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल होताच निसटण्यासाठी पंचवटीतील बागुल यांनी ‘मुंबई गाठल्याचे समजते. तर, लोंढे यांनी वरपर्यंत सेंटींग्जचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र, तत्पूर्वीच प्रकाश लोंढे यांच्यासह दीपकला अटक करण्यात आली. हे गुन्हे दाखल झाल्याने नाशिकमधील अनेक सराईत व तथाकथित भाईची पळापळ सुरु झाली असून त्यांनी ‘सुरक्षित’ ठिकाण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

YouTube video player

शहरातील गुन्हेगारांना (Criminal) राजकीय नेते पाठिशी घालत असल्याचे दावे होत असताना पोलिसांनी सबळ पुराव्यांनिशी सातपूर गोळीबार प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्यांचा मुलगा ‘नाना’ उर्फ दीपक याला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. तर, सरकारवाडा हद्दीतील गोळीबार प्रकरणात सुनील बागुल यांचा पुतण्या ‘भाऊ उर्फ अजय बागूल हा पसार आहे. एकूणच दोन्ही गुन्ह्यांत दहाहून अधिक जणांच्या अटकेसाठी गुन्हेशाखेची चार स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.

आयटीआय सिग्नलच्या हद्दीतील ‘ऑरा’ बारमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणात मुख्य संशयित दीपक याचा भाऊ भूषण अद्याप पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. ५ ऑक्टोबरच्या पहाटे अडीच वाजता आयटीआय सिग्रलवरील एका बारबाहेर काही तरुणांमध्ये झालेला वाद मिटविणाऱ्या बाऊन्सर्स’ला धक्काबुकी झाल्याने उद‌भवलेल्या ‘प्रोटेक्शन मनी’च्या वादातून गोळीबार झाला होता.

दरम्यान, हल्ल्यात तिवारी हा ग्राहक जखमी असून, बार चालकांकडे खंडणी मागण्यासह ठराविक बाउन्सर्स’ ठेवण्यासाठी सक्ती केल्याचे उघड झाले. याप्रकरणी जीवे ठार मारण्याच्या प्र्यत्नासह खंडणीप्रकरणी माजी नगरसेवकासह मुलगा भूषण प्रकाश लोंढे सह पंधरा जणांवर गुन्हा नोंद आहे. त्यात शुभम पाटील उर्फ भुऱ्या, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अंडागळे हे पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, गुन्हेगारीसंबंधाने पोलिसांनी बुधवारी सिडकोतील भाजपच्या एका नगरसेवकालाही सूचक इशारा दिला आहे.

अपहरण कांडामुळे लोंढे गोत्यात

‘ऑरा’ बारमध्ये गोळीबारानंतर पीएल’ ग्रुपमधील संशयित लोढेसह साथीदारांवर गुन्हा नोंद होताच लोंढे टोळीने या बारचे चालक बिपिन पटेल व संजय शर्मा यांच्यासह कुटुंबीयांचे अपहरण करीत त्यांना डांबून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात प्रकाश लोंढेसह त्यांचा मुलगा दीपक, भूषण लोंढे आणि संतोष पवार व अमोल पगारेसह इतरांवर अपहरणासह डांबून ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याही प्रकरणात सातपूर पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आदर्शनगर प्रकरण पूर्वनियोजित!

पंचवटीतील रामवाडी अर्थात आदर्शनगर व विसे मळा मार्गावरील गोळीबार व हल्ला प्रकरणात संदीप रघुनाथ शेळके (वय ४३, रा. रामवाडी), गौरव सुधाकर बागूल (३६, रा. पंचवटी), प्रेमकुमार दत्तात्रय काळे (३५) व वैभव उर्फ विकी दत्तात्रय काळे (२९, दोघे रा. रामवाडी) यांना अटक झाली आहे. त्यांना न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे, अजय बोरिसा, भाजप पदाधिकारी अजय बागूलसह पप्पु जाधव, सचिन कुमावत, बाँबी गोबर्धने, गोपाल दायमासह अज्ञात सात संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान, सचिन अरुण साळुंके (वय २८) याच्यावर २९ सप्टेंबर रोजी पहाटे गोळी झाडून अपहरण करीत मारहाण झाली. त्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत चोथवे आणि बोरिसाविरुद्ध गुन्हा नोंद आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केल्यावर काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बागूल यांच्या नातलगांसह जवळच्या कार्यकत्यांचा थेट संबंध आढळला. त्यावरून गुन्हेशाखा युनिट एकमध्ये आयुक्त संदीप कर्णिक यांनी इशारा देत कानउघाडणी केली होती. आता पोलीस अजयपर्यंत पोहोचत असून, इतरही राजकीय कनेक्शनन उघड होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...