Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : आमदार सरोज अहिरेंच्या घरी मोलकरणीची हातसफाई; पैशांवर मारला डल्ला,...

Nashik Crime : आमदार सरोज अहिरेंच्या घरी मोलकरणीची हातसफाई; पैशांवर मारला डल्ला, पोलिसांनी घेतलं ताब्यात

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

शहरातील विविध भागांत गेल्या दिवसांपासून चोरीचे (Stolen) प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या (NCP Ajit Pawar) देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या (Deolali Assembly Constituency) आमदार सरोज अहिरे यांच्या जेलरोड येथील घरी कामासाठी येणाऱ्या मोलकरणीनेच हातसफाई केली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) यांचे पती प्रवीण रामदास वाघ (रा. कलानगर, जेलरोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी फिर्यादीत (Fir) म्हटले की, ऑक्टोबर २०२४ पासून संगीता केदारे नावाची महिला घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. परंतु, ६ जुलै २०२५ रोजी दुपारच्या सुमारास घरातील बेडरूममधील कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरीस गेली.

YouTube video player

दरम्यान, प्रवीण वाघ (Praveen Wagh) यांनी काही वेळाने कपाट उघडताच त्यातून रक्कम गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) जाऊन मोलकरणीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी संगीता केदारे नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत.

ताज्या बातम्या

ममता

SIR: “निवडणूक आयोग हे व्हॉट्सॲप आयोगासारखे, फक्त नावे हटवण्यासाठी…”, ममता बॅनर्जींचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपश्चिम बंगालमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) खटल्याची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. या खटल्यावरून राजकीय...