ओझर | वार्ताहर | Ozer
बदलापूर (Badlapur) येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेला लैंगिक अत्याचार आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) वावी (Vavi) येथे एका साडेचार वर्षांच्या मुलीसोबत २५ वर्षीय नराधमाने गैरकृत्य करण्याचा केलेला प्रयत्न यासह राज्यातील विविध ठिकाणी घडलेल्या घटना उघडकीस येत आहेत. या घटना उघडकीस येत असतानाच आता माणुसकीला काळिमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात (Niphad) उघडकीस आली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत पोलिस पुत्राचा निर्घृणपणे खून
येथील दात्याने ओणे शिवारात सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) ऊसाच्या रानात नेत तिच्यावर लौगिक आत्याचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे. याबाबत पीडितेने ओझर पोलीस ठाण्यामध्ये (Ozer Police Station) दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेचा नात्याने सावत्र वडील असलेला दत्तू कुंडलिक वाघ हा दात्याने ओणे येथील शेतकऱ्यांच्या शेतात काम करतो. यावेळी अल्पवयीन पीडित फिर्यादी ही ओणे येथे आली असता आरोपीने पीडितेस बकऱ्यांना चारा आणायला चल असे सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Sinnar News : साडेचार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपी ताब्यात
त्यानंतर पीडिता आरोपीसोबत बकऱ्यांना चारा आणण्यासाठी गेली असतांना आरोपीने पीडितेसोबत बळजबरी करुन तिला द्राक्षबागेत अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. यावेळी पीडिता आरडाओरडा करायला लागल्यावर आरोपीने तिला मारहाण (Beating) करुन ओढत ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपीने पिडीतेच्या गळ्यावर खुरपे ठेवून ‘तू जर ओरडली, तर तुला जिवे ठार मारुन विहिरीत फेकुन देईल’अ शी धमकी दिली. यानंतर पीडितेने घडलेली सर्व घटना आपल्या आईला सांगितली असता आई व पीडित मुलीने ओझर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
हे देखील वाचा : Nashik News : पोलिसांच्या मदतीने दोन बेपत्ता मुली सुखरूप घरी परतल्या
दरम्यान, त्यानंतर ओझर पोलिसांनी (Ozer Police) आई व पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी दत्तू वाघ याच्याविरोधात सीसीटीएनस गु.र.नं. १७६ \ २०२४ भारतीय न्यायसंहीता २०२३ चे कलम ६५(१), २३८, ११५, ३५१ (२) (३), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीस समतानगर नाशिक येथून अटक (Arrested) केली. तर याप्रकरणी अधिक तपास ओझर पोलीस करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा