नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अल्पवयीन मुले (Minors ) आणि किशोरवयीन मुलांत ‘खुन्नस’ आणि एरिया सेपरेशनच्या वादातून गंगापूर हद्दीतील (Gangapur limits) संत कबीरनगरात शनिवारी (दि.८) रात्री घडलेल्या १७ वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात आणखी एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे आता केवळ दोन मुख्य संशयितांना अटक (Arrested) करणे बाकी असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली धारदार शस्त्राने व वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत अटकेतील संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अरुण रामलू बंडी (रा. खुटवडनगर, कामठवाडे शिवार, नवीन नाशिक) या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची शनिवारी (दि. ८) रात्री साडेदहा वाजता गंगापूर रोडवरील समर्थनगर रस्त्यावरील संत कबीर नगरातील भरस्त्यात हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर, पोलिसांनी प्राथमिक तपास करून सहा संशयितांचा सहभाग उघड केला. त्यानुसार, विलास संतोष धाठे (वय १८, रा. संत कबीरनगर गंगापूर रोड,) आणि ओम खंडागळे (वय १८, रा. संत कबीरनगर) यांना घटनेनंतर काही तासांत अटक केली होती आणि एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले होते. तर, करण उमेश चौरे (वय १९) आणि त्याचा साथीदार व एक विधिसंघर्षित मित्र पसार झाले होते. त्यांच्या शोधार्थ चार पथके मागावर असताना, रविवारी रात्री उशिरा दुसऱ्या विधिसंघर्षित बालकास पथकाने ताब्यात घेतले. त्याला बालन्यायमंडळासमोर हजर करून मुख्य संशयिताचा (Suspected) माग काढण्यास सुरुवात केली आहे.
परप्रांतीय अल्पवयीन गुन्हेगारीत
शहरात (City) आतापर्यंत घडलेल्या खून, प्राणघातक हल्ले व चोरी, दरोडा आणि अन्य गंभीर गुन्ह्यांत बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील संशयितांचा सहभाग समोर आला आहे विशेषत्वे आडगाव, सातपूर, उपनगर व अंबड हद्दीत भाडेतत्वाने कुटुंबासह वास्तव्य करणाऱ्या संशयितांनी अल्पवयीन गुन्हेगारीकडे आकबून गंभीर गुन्हे घडविले आहेत. त्यातच आता दक्षिण भारतातून नाशकात आलेल्या अल्पवयीन अरुणच्या दमदाटीला वैतागून संशयितानी त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले आहे.
अल्पवयीन मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष
अरुण व विधिसंघर्षित बालके व अटकेतील संशयितांची एकमेकांशी जुनी भांडणे होती. नेहमीच्या कुरबुरीला कंटाळून संशयितानी स्प्राॅकेटससदृश्य हत्यार व चाकूने अरुणच्या डोक्यात व शरीरावर घाव घालून हत्या केली. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. अरुण हा मूळचा दक्षिण भारतातील असून त्याचे कुटुंब मोलमजुरीसाठी काही वर्षांपासून नाशकात स्थायिक झाले आहे. तर, या खून प्रकरणातील सर्वच संशयितांचे पालक हे मोलमजुरी करतात. मात्र, तरुण मुले बेरोजगार असून अल्पवयीन मुलांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
मुद्दे
- एरियात एन्ट्री करायची नाही म्हणून बाद
- गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त विधिसंघर्षितांव्या पालकांची चौकशी
- समुपदेशनही होणार
- बंडी कुटुंब शोकमग्र, मृत अरुणच्या थोरल्या भावाने नोंदविली फिर्याद