Thursday, January 8, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'ड्रग्ज सिंडिकेट'मध्ये महिलाराज

Nashik Crime : ‘ड्रग्ज सिंडिकेट’मध्ये महिलाराज

अंमली पदार्थ विक्री, तस्करीच्या चार घटनांत सात महिला मास्टरमाईंड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात एमडी ड्रग्जच्या (MD Drugs) आधीन गेलेल्या नव्या पेडलरांची साखळी उघड झाल्यावर त्यातील एक महिला इंदोर व्हाया नाशकात (Nashik) एमडी ड्रग्जची डिल करत असल्याचे समोर आले आहे. या चारही पेडलरची घनिष्ट मैत्री असून आतापर्यंत नाशिकमध्ये झालेल्या एमडीच्या कारवायांत महिला संशयितांचा (Female Suspects) अधिकचा सहभाग चिंतेचा विषय ठरतो आहे.

- Advertisement -

नाशकात मॅफेड्रॉन (एमडी) तस्करीच्या गुन्ह्यात ‘छोटी भाभी’, हिना शेख, ड्रग्जमाफिया ललित पानपाटीलची मैत्रिण प्रज्ञा व अर्चना पाठोपाठ आता तीन तरुणींचा सहभाग उघड झाला आहे. नाशिक आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अटक केलेल्या एका पुरुषासह तीन महिलांपैकी संशयित पल्लवी निकुंभ ही ‘मास्टरमाइंड’ असून तिचा पती मध्यप्रदेशातील इंदूरच्या एका एमडी कारखान्यातील गुन्ह्यात संशयित असून त्याच्या पाठींब्याने तिने नाशिकच्या तस्करीत पाऊल टाकल्याचे समोर आले आहे.

YouTube video player

शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) मुंबई नाका परिसरातील खासगी ट्रॅव्हल्स थांब्याजवळ आणि हॉटेल सरोजमध्ये शनिवारी (दि. ११) छापा टाकला. तिथे गणेश कैलास गिते (वय ४५, रा. मखलमलाबाद) याला अटक केली. त्यानंतर हॉटेल सरोजमध्ये मुक्कामी असलेल्या ऋतुजा भास्कर झिंगाडे (वय २२, रा. शिवाजी पार्क, सातपूर), स्वीटी सचिन अहिरे (वय २८, रा. श्रीधर कॉलनी, पेठरोड) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राहत्या घरातून पल्लवी निकुंभ उर्फ सोनाली शिंदे (वय ३६, रा. साईनगर, अमृतधाम) हिला ताब्यात घेतले.

या चौघांनी त्यांचे तीन साथीदार फरहान, शकील व महेश सोनवणे उर्फ जॉकी यांच्यासोबत संगनमताने ‘एमडी’ची तस्करी के ल्याचे समोर आले. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, अंमलदार बाळासाहेब नांद्रे, अनिरुद्ध येवले, बळवंत कोल्हे, चंद्रकांत बागडे, अर्चना भड, अविनाश फुलपगारे, योगेश सानप, भारत डंबाळे यांचे पथक उर्वरित संशयितांच्या मागावर रवाना झाले आहेत.

मुद्दे

चौघेही स्वतःचे घर नाशिकमध्ये असताना, तस्करीसाठी हॉटेलात मुक्कामी संशयित पल्लवी निकुंभ ‘मास्टरमाइंड’, तिच्या पतीने तस्करीचा मार्ग दाखवला.

संशयित गिते, झिंगाडे, अहिरे, निकुंभ हे सर्वजण ‘ड्रग्ज डिक्ट’.

एमडीची नशा करताना विक्रीला सुरूवात.

संशयित झिंगाडेच्या पतीचा खून; अहिरेचा पती खुनाच्या प्रयत्नात कारागृहात.

गिते व एका संशयित महिलेचे अनैतिक संबंध पल्लवी ही मुंबईतून एमडी आणायची; पुन्हा मुंबईपर्यंत धागेदोरे.

शहरातील कामगार, स्लम, गर्दुल्ले व इतरांना एमडीची विक्री.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...