Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : मोबाईल हिसकावणारे ताब्यात; सजग नागरिकामुळे घटना टळली

Nashik Crime : मोबाईल हिसकावणारे ताब्यात; सजग नागरिकामुळे घटना टळली

गडकरी चौकातील धक्कादायक ‘व्हिडीओ व्हायरल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Aagra Highway) गडकरी चौकात रात्री साडेअकरा वाजेदरम्यान गावाहून परतणाऱ्या पत्नीची वाट पाहणाऱ्या व्यक्तिचा मोबाईल हिसकावणाऱ्या तिघा विधिसंघर्षितांना मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) अवघ्या २४ तासांत सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीचे सातशे रूपये, गुन्ह्यात वापरलेली माेपेड (एमएच १५-जीके ३४६८) जप्त केली. दरम्यान, या धक्कादायक लुटमारीसह हल्ल्याच्या प्रयत्नाचा ‘लाईव्ह व्हिडीओ’ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत गडकरी चौकात गुरूवारी (दि.२३) रात्री ११.३० वाजेदरम्यान समाधान चैतराम पाटील (वय ३३, रा. शिवरे, ता. पारोळा. जि. जळगाव) हे पत्नीची वाट बघत होते. त्यावेळी अनोळखी तीन जण माेपेडवरुन पाटील यांच्याजवळ आले. तिघांनी पाटील यांचा मोबाईल (Mobile) हिसकावला. त्यानंतर त्या मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवलेले सातशे रूपये घेत धमकी देऊन संशयित तिघे दुचाकीवरून पळून गेले.

YouTube video player

दरम्यान, संशयितांनी युवकावर (Youth) दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा व्यक्तिने आपल्या माेपेडचे सीट हातात घेऊन संशयितांचा प्रतिकार केला. मुंबईनाका पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२५) गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे आदेश पाेलीस आयुक्तांनी दिले. यानंतर, पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे ओळख पटवून तिघांचा शोध घेतला.

सजग नागरिक आला धावून

रात्री घटना घडत असताना एका रिक्षातून चालक प्रवासी गडकरी चाैकातून चांडक सर्कलकडे जात हाेते. त्यांना ही गंभीर घटना नजरेस पडली. त्यांनी न डगमगता धैर्याने व्हिडीओ चित्रिकरण करीत पीडित व्यक्तिकडे सजगतेने विचारणा केली. तेव्हा त्याने धक्कादायक प्रकार सांगितला. यानंतर सजग नागरिकाने संशयितांकडे विचारणा करुन त्यांना गुन्हा करण्यापासून परावृत्त केल्याचे व्हिडीओतून दिसते.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...