Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Crime : उद्धव निमसेंची रवानगी तुरुंगात; वैद्यकीय उपचाराबाबत आदेश देण्यास नकार

Nashik Crime : उद्धव निमसेंची रवानगी तुरुंगात; वैद्यकीय उपचाराबाबत आदेश देण्यास नकार

नाशिक | Nashik

नांदूर नाका भागात राहुल संजय धोत्रे (Rahul Dhotre Murder Case) याच्या खुनप्रकरणी अटकेत असलेले भाजपचे माजी नगरसेवक संशयित उद्धव निमसे (Uddhav Nimse) यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nashik District Sessions Court) शनिवारी (दि. २०) चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे सायंकाळी निमसे यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. कोणत्याही स्वरुपाचे वैद्यकीय उपचार घेण्याबाबत आदेश देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे.

- Advertisement -

२२ ऑगस्ट रोजी हल्ला झाल्यानंतर उपचारादरम्यान २९ ऑगस्ट रोजी राहुल धोत्रेचा मृत्यू (Death) झाला होता. तेव्हा प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात वाढीव कलमांन्वये खुनाचा (Murder) गुन्हा नोंदविण्यात आला. प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने निमसे निर्धास्त होते. परंतु, खुनाच्या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी ‘एसआयटी’ नेमल्याने निमसे पुन्हा पसार झाले. १० सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

YouTube video player

दरम्यान, मंगळवारी (दि. १५) गुंडा विरोधी पथकासमोर शरण आलेल्या निमसे यांना बुधवारी (दि. १५) न्यायालयात हजर करण्यात आले. खुनाचे कारण, हेतू, इतर संशयितांचा सहभाग या मुद्द्यांनुसार सखोल चौकशीसाठी न्यायालयाने त्यांची २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली होती. या चौकशीदरम्यान पोलिसांनी (Police) सबळ पुरावे न्यायालयात सादर केल्यानंतर निमसेंना १ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनाविण्यात आली.

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....