Saturday, January 24, 2026
Homeक्राईमNashik Crime : अखेर भाजप नेते सुनील बागुलांच्या पुतण्याला बेड्या; नाशिक पोलिसांची...

Nashik Crime : अखेर भाजप नेते सुनील बागुलांच्या पुतण्याला बेड्या; नाशिक पोलिसांची कारवाई

नाशिक | Nashik

दोन दिवसांपूर्वी विसे मळा गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचे समर्थक बाबासाहेब ऊर्फ मामा वाल्मिक राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना गुन्हे शाखेने अटक (Arrested) केली होती. यानंतर त्यांना नाशिक न्यायालयात (Nashik Court) हजर केले असता न्यायालयाने सोमवार (दि. १३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याचा देखील समावेश होता. मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी अजय बागुलसह दोघांना अटक केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल आणि पप्पू जाधवसह एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे दोघे अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. राणेनगरात (Rane Nagar) राहणाऱ्या सचिन अरुण साळुंके (वय २८) याच्यावर २९ सप्टेंबर रोजी पहाटे गोळी झाडून अपहरण करीत त्याला बोरिसा व चोथवे यांनी मारहाण केली होती. या हल्ल्यानंतर साळुंकेने (दि. ५) रात्री उशिराने पोलिसांत धाव घेत सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली होती.

YouTube video player

दरम्यान, यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गोळीबारानंतर पोलिसांनी तपास केला असता, त्यात अजय बागुलचा समावेश असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत गुरुवारी (दि. ९) मामा राजवाडे याची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. यानंतर शुक्रवार (दि. १०) रोजी राजवाडेसह अमोल पाटीलला पोलिसांनी अटक केली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी अजय बागुलसह दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...