Saturday, January 24, 2026
HomeनाशिकNashik Crime : 'कायद्यात राहा, नाहीतर गुन्हे शाखेत स्वागत नक्की'; आयुक्तालयाचा इशारा

Nashik Crime : ‘कायद्यात राहा, नाहीतर गुन्हे शाखेत स्वागत नक्की’; आयुक्तालयाचा इशारा

सणोत्सवातही 'चाय पे चर्चा'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राजकीय जवळीक दाखवत समाजात दहशत निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी अगोदर ‘गुन्हे शाखा युनिट एक’ या फलकाकडे एकदा नीट बघावे. हा फलक तुमच्या आठवणीत, मोबाईल वॉलपेपरमध्ये आणि मनात कायमचा कोरून ठेवा. कारण नाशिक पोलिसांच्या नजरेतून कोणीही सुटणार नाही’, असा इशारा आयुक्तालयाने (Nashik Police Commissionerate) राजाश्रय लाभलेल्या संशयित पदाधिकारी व समर्थकांना दिला आहे.

- Advertisement -

शहरातील गुन्हेगारी (Criminal) नियंत्रणासाठी गुन्हे शोध पथकाने सराईतांसह राजकीय पार्श्वभूमीच्या संशयितांना ‘चाय-पे-चर्चे’ साठी बोलावत ‘पाहुणचार’ केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, ‘कायद्यात राहा, नाहीतर गुन्हे शाखेत स्वागत नक्की’ असा इशारा देत सणोत्सवातही ‘पाहुणचार’ सुरूच ठेवण्याची भूमिका पोलिसांनी (Police) घेतली आहे.

YouTube video player

शहरात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून, सराईत गुहेगार, टवाळखोर, मद्यपींसह राजकीय पार्श्वभूमीच्या गुन्हेगारांवरही पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. दोन ‘बड्या’ नेत्यांची कानउघाडणी करून भाजप, शिवसेना शिंदे गटासह इतर राजकीय पक्षांत कार्यकर्ते म्हणून मिरवणारे आणि गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाचे रिल्स व बॅनर्स लावणाऱ्यांवरही गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे ‘राजाश्रय’ असणाऱ्या गुन्हेगारांसह त्यांची ‘पाठराखण’ करणाऱ्यांचीही धास्ती वाढली आहे. यासह कोणत्याही स्वरुपाच्या दबावाला बळी पडू नका. एखादा नेता, पदाधिकारी, व्यक्ती दबाव निर्माण करत असेल,तर थेट आयुक्तालयात त्यासंदर्भात माहिती द्या, असे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.

‘नाशिक पॅटर्न’ परराज्यातही

संशयितांना अटक (Arrested) केल्यानंतर त्यांना ‘फराळ’ व ‘फटके’ देत न्यायालयात हजर करताना त्यांनी स्वतःहून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणणे, हा ‘नाशिक पॅटर्न’ राज्यासह देशात चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यातील पुणे, मुंबईत ‘नाशिक पॅटर्न’ राबवण्यास सुरुवात झाली असून, इतर राज्यातही त्याबाबच विचारमंथन होत आहे. नाशिक पोलिसांच्या मतानुसार, ‘हा पॅटर्न केवळ कारवाई नाही. तर प्रत्येक भागातील संशयितांसह गुंडांना धडा शिकवण्यासाठी एक दृढ मोहीम आहे. विशेष म्हणजे हा ‘पॅटर्न’ आता नाशिकनंतर पुणे व थेट छत्तीसगढपर्यंत पोहोचल्याचे सोशल मीडियावरून दिसते.

ठळक मुद्दे

  • रस्त्यात केक कापणारे, वाढदिवस साजरे करणाऱ्यांवरही गुन्हे
  • वीस दिवसांत शहरात ३,६८८ टवाळखोरांवर कारवाई
  • दहा महिन्यांत शहरात ३० हजारांहून अधिक टवाळखोरांवर कारवाई
  • सराईत गुन्हेगारांची धरपकड, प्रतिबंधात्मक कारवायांत वाढ
  • रस्त्यालगत मद्यसेवन करणाऱ्यांवर गुन्हे व दंडुक्याचा प्रसाद

ताज्या बातम्या

Kamaal R Khan : अभिनेता कमाल खानला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी;...

0
मुंबई | Mumbai अंधेरीतील ओशिवरामध्ये एका रहिवासी इमारतीवर रविवार (दि.१८) रोजी दोनदा बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याप्रकरणी अभिनेता...